वाजेगाव वळण रस्त्यावर लुट; महिलेचे गंठण तोडले

नांदेड(प्रतिनिधी)-7 जून रोजी दोन युवकांनी वाजेगाव बायपास रस्त्यावर तलवार आणि खंजीरच्या धाकावर 46 हजार रुपयांची लुट केली आहे. तसेच पुष्पनगर नांदेड येथे दोन अनोळखी आरोपींनी एका महिलेचे सोन्याचे गंठण तोडून चोरी केले आहे.
वासरी ता.मुदखेड येथील पेट्रोल पंपाचे मॅनेजर बाबूराव खोब्राजी कल्याणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.7 जून रोजी मध्यरात्रीनंतर 2.30 वाजेच्यासुमारास ते आणि त्यांचा मुलगा 2.30 वाजेच्यासुमारास दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 सी.एच.1109 वर बसून वासरी गावाकडे जात असतांना वाजेगाव वळण रस्त्यावर लालवाडीच्या अलिकडे दुसऱ्या दुचाकीवर बसून आलेल्या 2 जणांनी तलवार त्यांच्या उजव्या मांडीवर मारुन शिवीगाळ करत त्यांची लुट केली. तसेच त्यांच्या मुलाच्या खिशातील मोबाईल सुध्दा बळजबरीने चोरला. 34 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि 12 हजार रुपये रोख रक्कम अशी लुट यात झाली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 473/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे हे करणार आहेत.
पुष्पनगर भागात राहणाऱ्या 64 वर्षीय महिला सुशिला दिगंबरराव पाटील या 10 जूनच्या सकाळी 5.46 वाजेच्यासुमारास मॉर्निंग वॉक करत असतांना त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण बळजबरीने तोडून नेले आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 239/2024 नुसार दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नागरगोजे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *