नांदेड/प्रतिनिधी-निट परीक्षेच्या निकालात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यामुळे दिवस-रात्र मेहनत करणार्या विद्यार्थ्यांचे भवितव्य शासनाच्या चुकीमुळे उध्वस्त झाले आहे. निट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली एस आयटी स्थापण करावी यासह अन्य मागणीसाठी युवक कॉंग्रेस, पीटीए सीसीटीएफ अन्य संघटनांच्यावतीने शुक्रवार दि.14 जून रोजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व नवनिर्वाचित खा.वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज आटकोरे, प्रा. नागेश कल्याणकर, प्रा. संतोष पाटील, प्रा. पियुष चौरसिया, कुलदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना गाडे म्हणाले की, यंदाच्या निट परीक्षेमध्ये काही राज्यात पेपरफुटी झाली. त्याुळे ाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे.एनटीए च्या चुकीच्या धोरणामुळे मर्यादित राज्यातील ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी ग्रेसमार्क देण्यात आले आहेत. दिवस-रात्र अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व भ्रष्टाचारी धोरणामुळे घरी बसावे लागत आहे. निटची परीक्षा पुन्हा घेतली जावी या मागणीसाठी नांदेड येथे 14 जून रोजी सकाळी 9 वाजता भाग्यनगर ते महात्मा फुले दाम्पत्यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित राहण्याचे आवाहन युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांनी केले आहे.