वजिराबाद गुन्हे शोध पथकाने तीन गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद गुन्हे शोध पथकाने तीन गुन्हेगारांना पकडून तीन गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे पकडली आहेत. हे गावठी पिस्तुल त्या तिघांना विक्री करण्यासाठी देण्यात आले होते. त्याचेही नाव या तक्ररीत आहे.
पोलीस अंमलदार विजयकुमार नंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जनू रोजी पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.डी.वटाणे, पोलीस अंमलदार मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, शेख इमरान, शेख एजाज, बालाजी कदम, रमेश सुर्यवंशी, मेघराज पुरी, भाऊसाहेब राठोड, अंकुश पवार आदी आरोपींचा शोध घेत असतांना हिंगोली गेट जवळ दोन जणांकडे पिस्तुल असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची नावे गोपाल सुदर्शन चव्हाण रा.दत्तनगर तामसा ता.हदगाव जि.नांदेड ह.मु.नमस्कार चौक नांदेड, शुभम राजूसिंह परदेशी (24) रा.समर्थनगर, शोभानगरजवळ नांदेड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. त्या दोघांनी दिलेल्या माहितीवरुन मनोज मोहन मोेरे (20) रा.कारेगाव ता.लोहा जि.नांदेड यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी पिस्तुल आणि 3 जिवंत काडतुसे सापडली. या तिघांना रणविरसिंघ उर्फ शेरा उर्फ टायगर रा.देवनगर तांडा ता.घनसांगवी जि.जालना याने विक्री करण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. वजिराबाद पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 261/2024 भारतीय हत्यार कायदानुसार दाखल केला आहे. या प्रकरणात सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर आणि दिपक ओढणे यांनी वजिराबाद पोलीसांना तांत्रिक मदत केली आहे. पकडलेले तीन पिस्टल आणि पाच जीवंत काडतुस यांची किंमत 1 लाख 22 हजार 500 रुपये दाखविण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सीएम यांनी वजिराबाद पोलीसंाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *