नांदेड (जिमाका)- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज येत्या 3 जून ते 15 जून 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यत करावेत, असे आवाहन सचिव माणिक बांगर यांनी केले आहे.
ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास तपशील पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी सोमवार 3 जून ते शनिवार 15 जून 2024 च्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर ऑनलाईन नावनोंदणी अर्ज मंगळवार 5 जून ते 18 जून 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे लागतील. सोमवार 24 जून 2024 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी 8 वीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http:/msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.