नांदेड शहराजवळ सापडले काडतुसांचे गुप्त धन

नांदेड(प्रतिनिधी)-पावडेवाडी शिवारातील एका नाल्यात गेलेल्या एका बालकाला गुप्त धन सापडले. गुप्त धन अर्थात सोन्याच्या नाण्यांचे हे गुप्त धन नाही तर 1978 मध्ये बनलेले काडतुसांचे गुप्त धन होते. सापडले तेंव्हा हे सर्व काडतुस जिर्ण अवस्थेत आहेत. पण एवढ्या मोठ्या संख्येत अर्थात 436 काडतुसे सापडली. ती जुनी आहेत पण शोध घेण्यासारखी आहेत.
काल रात्री पावडेवाडी शिवारातील एका नाल्यात एक बालक गेला तेंव्हा त्याला गोळया, काडतुसे दिसली. त्याने ही बाब आपल्या घरच्यांना कळवली. घरच्यांनी भाग्यनगर पोलीसांना बोलावले. तेंव्हा भाग्यनगर येथील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख, पोलीस अंमलदार गजानन किडे, प्रदिप गर्दनमारे, राठोड, कळके, ओमप्रकाश कवडे, हनवता कदम, कदम असे तेथे पोहचले. पावडेवाडी शिवारात आकाश रामराव पावडे यांच्या शेतशिवारातून जाणाऱ्या नाल्यामध्ये झाडाझुडूपांमधून आत गेल्यावर तेथे एकूण 436 काडतुसे सापडली आहेत. या काडतुसांवर 7.62 स्पेस ओएफव्ही-78-एम-80 असे लिहिलेले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सीएम, पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे, दहशतवाद विरोधी पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक यांनी घटनास्थळी भेट दिली आणि सापडलेल्या राऊंडचा अभ्यास केला असता. 1978 मध्ये तयार झालेले हे काडतुस आहेत. अर्थात त्याला आता 46 वर्ष होत आली आहे. ज्या ठिकाणी ही काडतुसे सापडली आहेत. त्या ठिकाणी ती नक्कीच लपवलेली होती. पण का? , कोणी? याचा शोध लागणे आज सध्या तरी अवघड दिसते आहे. ज्या ठिकाणी ही काडतुसे लपवली तेथून ती माती झिजल्यामुळे ही काडतुसे बाहेर पडली. ही काडतुसे ज्या बंदुकीने उडविली जातात ती एमएमजी बंदुक फक्त सैन्याकडे असते. आजच्या परिस्थितीत पोलीसांकडे ही काडतुसे लावून उडविण्यासाठीची नवीन बंदुक आहे. परंतू एका साखळीत सापडलेली ही काडतुसे फक्त एलएमजीमध्येच लागतात. या संदर्भाचा तपास भाग्यनगर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *