पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे विरुध्द दाखल झालेल्या नोटीसच्या गुन्ह्याला काही पत्रकार रंग भरत आहेत

नांदेड(प्रतिनिधी)-आपण पत्रकार असतांना इतरांच्या चुका दाखविण्याची एक सामाजिक जबाबदारी आपली आहे. हे खास करून दाखविण्याच्या नादात कशाला काय म्हणते आहोत याचेही भान राहत नाही. काही दिवसांपुर्वीच काही तासांच्या अंतरामध्ये घडलेल्या दोन आत्महत्या प्रकारांना सुध्दा पत्रकारांनी मड्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार करून सोडला होता. नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्यावर नोटीस देण्याची पात्रता असलेला गुन्हा दाखल झाल्यानंतर तांदळे यांनी काही तरी सामाजिक गुन्हा केला असल्याचा देखावा तयार केला जात आहे.
जालिंदर म्हणजे पाण्याच्या आतील भाग उत्तर भारतातील सतलज आणि बियास या दोन नद्यांमध्ये असलेल्या खालच्या भागाला जालिंदर असे म्हणतात. तसेच जालिंदर यांना पर्यायी नाव त्रिगर्त असे आहे. कारण त्या ठिकाणी तसलज-बियास-रावी या तिन नद्या वाहतात. आपली बातमी लिहितांना काही बोरु बहादरांनी आपल्या बातमीमध्ये जालिंदर तांदळे यांच्याबद्दल अरे-तुरेचे शब्द वापरले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी जालिंदर तांदळे हे काही कामानिमित्त पुणे येथे गेले होते. तेथे वाहतुक जाम असतांना दुसऱ्या एका माणसासोबत त्यांचा वाद झाला. बातमी लिहिणाऱ्यांना हे सुध्दा माहित नाही की, खोळंबलेली वाहतुक सरळ करण्यासाठी बहुदा जालिंदर तांदळे आपल्या गाडीच्या खाली उतरले आणि मागच्या गाडीवाल्यासोबत त्यांचा वाद झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांना पोलीस खात्यातून मिळालेली बंदुक होती असे बातमीत लिहिले आहे. ही बंदुक त्यांनी तेथे वाद झालेल्या व्यक्तीच्या कानशिळात लावली असेही लिहिले आहे. ही बंदुक कानशिळात लावली असती तर त्यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असता. परंतू पुणे येथील चर्तु:श्रृंगी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 505(2), 188, 34 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 2,25 अन्वये गुन्हा दाखल झाल्याचे लिहिले आहे.
हा गुन्हा घडून बरेच दिवस झाले. पण ही बातमी लिहितांना पुणे पोलीसांनी नांदेड पोलीस अधिक्षकांकडून अहवाल मागविल्याचे लिहिले आहे. त्यात सुट्टीवर जातांना जालिंदर तांदळे यांनी बंदुकीची परवानगी मागितली होती काय? किंवा त्यांच्या जिवाला धोका होता काय? असा त्या अहवालाचा मतितार्थ असावा असे बातमीत लिहिले आहे. सोबतच नांदेडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक पोलीस निरिक्षक तांदळेला वाचवतात की कायद्याचे कठोर पालन करून वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल पाठवितात हे लवकरच कळणार आहे हे विशेष असे लिहिले आहे. ही बातमी लिहिणारा प्रतिनिधी सुध्दा विशेष प्रतिनिधी आहे.
योगेश्र्वर काय करतील याचा अंदाज बांधण्यात आला आहे. पोलीस दलातील किंवा पोलीस नियमावलीप्रमाणे योगेश्र्वर हे जालिंदर तांदळे यांचे कुटूंब प्रमुख आहेत. आपण पत्रकार म्हणून कोठे जातांना काही कोणासोबत वाद झाला तर आम्ही पत्रकार आहोत असे जोरात ओरडून सांगतो. पोलीस अधिक्षक कार्यायात जातांना कार्यालयातील सुरक्षा रक्षकांनी आम्हाला अडवले तर तेथे वेगळा धिंगाणा घालतो. जालिंदर तांदळे यांच्यासोबत वाद करणारा हा दुधाने आंघोळ केलेला असेल काय? त्यावेळी जालिंदर तांदळे यांनी त्यास मी पोलीस असल्याचे सांगितले असेल किंवा त्यांच्या कमरेला अडकवलेली बंदुक त्या व्यक्तीला दिसली असेल म्हणून त्याने त्यांच्याविरुध्द तक्रार दिली असे होवू शकत नाही काय?
दोन आत्महत्या प्रकरणांमध्ये मुगगिळून गप बसणारे अनेक पत्रकार नांदेडमध्ये आहेत. त्यांना मात्र जालिंदर तांदळे विरुध्द दाखल झालेला गुन्हा म्हणजे देशविघातक कृत्य घडले असे वाटते आहे. अनेकांनी काल पुण्याला दुरध्वनीवरुन सुध्दा याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना किती यश आले हे समजले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *