नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत नांदेड येथील अल रिझवान इंग्लीश स्कूलची विद्यार्थीनि मुन्जजा अफशीन मुंतजीबोद्दिन हिने ९५.२० टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे हिने कोणतीही खासगी शिकवणी लावलेली नव्हती. मुन्जजा अफशीन स्वतःची मेहनत व शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे आणि यू पी एस सी ची तयारी करायची आहे, असे तिने सांगितले. माजी नगरसेवक व दैनिक नांदेड टाईम्स उर्दू चे संपादक मुंतजीबोद्दिन यांची मुन्जजा ही कन्या आहे.तिचे आजोबा फैजुल उलूम हाई स्कूल व ज्युनियर कॉलेज चे सेवानिवृत्त मुख्यअध्यापक मुनीरोद्दिन यांनी व नातलगांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिले.
More Related Articles
गुरु गोबिंद सिंघजी हे विश्वाचे तारक –कुलगुरू डॉ. चासकर
नांदेड (प्रतिनिधी)- श्री गुरु गोबिंद सिंघजी यांचे विचार भारताला नव्हे तर ते विश्वाला मार्गदर्शक होते.…
इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे अतिविलंब शुल्काने आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ
नांदेड,(जिमाका)-जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र…
संविधान अमृत महोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
नांदेड(प्रतिनिधी)-26 नोव्हेंबर रोजी विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देवून 75 वर्ष पुर्ण झाली आहेत.…
