नांदेड(प्रतिनिधी)-29 मे च्या रात्री 12 वाजेनंतर गस्त करणाऱ्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी एका युवकाकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतुसे पकडली आहेत. इतवारा पोलीस उपविभागातील विशेष गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे, चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे आणि सायबर शाखेचे राजेंद्र सिटीकर हे गस्त करत असतांना नावघाट परिसरात नदी पात्राजवळ त्यांनी गिरीष गोपाळराव जाधव (24) रा.इतवारा नांदेड याची तपासणी केली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतुसे सापडली. या संदर्भाने इतवारा पोलीस ठाण्यात गिरीश जाधव विरुध्द भारतीय हत्यार कायद्याच्या कलमानुसार गुन्हा क्रमांक 184/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरिक्षक संग्राम जाधव करीत आहेत. गावठी पिस्तुल व काडतुस पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,589 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रीकी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची 7 लाख 84 हजारांची फसवणूक आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम