नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत नांदेड येथील अल रिझवान इंग्लीश स्कूलची विद्यार्थीनि मुन्जजा अफशीन मुंतजीबोद्दिन हिने ९५.२० टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे हिने कोणतीही खासगी शिकवणी लावलेली नव्हती. मुन्जजा अफशीन स्वतःची मेहनत व शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे आणि यू पी एस सी ची तयारी करायची आहे, असे तिने सांगितले. माजी नगरसेवक व दैनिक नांदेड टाईम्स उर्दू चे संपादक मुंतजीबोद्दिन यांची मुन्जजा ही कन्या आहे.तिचे आजोबा फैजुल उलूम हाई स्कूल व ज्युनियर कॉलेज चे सेवानिवृत्त मुख्यअध्यापक मुनीरोद्दिन यांनी व नातलगांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिले.
More Related Articles
दहावी-बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरण्यासाठी मुदतवाढ
नांदेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त इ. 10 वी…
स्वारातीम विद्यापीठ सलग ४ दिवस सुट्यामुळे बंद राहणार
नांदेड-सलग चार दिवस सुट्टी येत असल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे मुख्य परिसर, उपपरिसर…
मैं जिंदगी में एक ही बार फेल हुआ और मुझे फेल होने का मतलब समझ में आ गया
नांदेड- मैं शारदा भवन स्कूल में उस टाईम चौथी कक्षा में पढ रहा था…मेरे पिताश्री…
