नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत नांदेड येथील अल रिझवान इंग्लीश स्कूलची विद्यार्थीनि मुन्जजा अफशीन मुंतजीबोद्दिन हिने ९५.२० टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे हिने कोणतीही खासगी शिकवणी लावलेली नव्हती. मुन्जजा अफशीन स्वतःची मेहनत व शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे आणि यू पी एस सी ची तयारी करायची आहे, असे तिने सांगितले. माजी नगरसेवक व दैनिक नांदेड टाईम्स उर्दू चे संपादक मुंतजीबोद्दिन यांची मुन्जजा ही कन्या आहे.तिचे आजोबा फैजुल उलूम हाई स्कूल व ज्युनियर कॉलेज चे सेवानिवृत्त मुख्यअध्यापक मुनीरोद्दिन यांनी व नातलगांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिले.
More Related Articles
गरजवंतांना सर्व काही फुकट देणारी आई
पुणे-जीवन जगतांना आपल्याला काय हवे हा विचार करतो तेंव्हा सर्वांनाच श्रीमंती हवी असते. परंतू फक्त…
बारावी परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांची नोंदणी
परीक्षेसंदर्भात अडचणी असल्यास हेल्पलाईनवर संपर्क साधा नांदेड, – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,…
इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल
नांदेड (जिमाका)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणारी…