नांदेड(प्रतिनिधी)-विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या प्रकरणात चालविलेल्या मिडीया ट्रायल कोणाच्या सुपारीवरुन होते. हे आता व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन स्पष्टपणे जाणवते.
काही दिवसांपुर्वी कल्याणीकरण पुणे येथे एका अल्पवयीन बालकाच्या हाताने झालेल्या अपघात प्रकरणात मिडीया ट्रायल झाले आणि या मिडीया ट्रायलमुळे त्या बालकाला मिळालेली जामीन रद्द झाली आणि त्याच्या वडीलांना अटक झाली. ते आजही पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणावर मिडीया ट्रायल का झाले या संदर्भाचा एक व्हिडीओ सामाजिक संकेतस्थळांवर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये विधीसंघर्षग्रस्त बालकाचा वडील आणि मोठ-मोठ्या नेत्यांचे फोटो जोडलेले आहेत. या व्हिडीओवरुनच हे स्पष्ट जाणवते की, मिडीया ट्रायल का करण्यात आले. कोणी ही मिडीया ट्रायलची सुपारी दिली अशा पध्दतीने लोकशाही चालणार असेल तर भारत देशाचे काही खरे नाही. प्रचार माध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाते आणि तो आधार अशा सुपाऱ्यांच्या आधारावर मिडीया ट्रायल करत असेल तर याची फळे सुध्दा कधी भोगावीच लागतील.