आज एक दिवसाचा दुखवटा

नांदेड,(जिमाका)- इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष महामहिम डॉ. सय्यद इब्राहिम रईसी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री महामहिम हुसेन अमीर-अब्दोल्लाहिया यांचे एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले असून श्रद्धांजली म्हणून भारत सरकारने मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

या शोक दिनी राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकत असलेल्या सर्व इमारतींवर मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी राष्ट्रध्वज अर्ध्यावर घेण्यात यावा आणि सदर दिवशी कोणतेही मनोरंजनाचे शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी बिनतारी संदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *