नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव तालुक्यातील अनेक गावांना मिळणारा वीज पुरवठा योग्यरितीने मिळावा असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दिपक बाबूराव जाधव पाटील यांनी वीज वितरण कंपनीला दिले आहे.
महावितरण आष्टी उप केंद्रातून होणारा वीज पुरवठा कांडली फिडर ओव्हर लोडमुळे योग्य प्रकारे होत नाही. त्यासाठी रुद्राणी फिडरवर वटफळी, बोरगाव, कांडली(बु) आणि कांडली (खु) या गावांचा वीज पुरवठा जोडून दिला तर या गावांना होणारा वीजेचा प्रश्न संपुष्टात येईल. दिपक जाधव यांनी हे निवेदन वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता कार्यालय भोकर यांना दिले आहे. रब्बीच्या हंगामात लागवड केलेल्या पिकांना त्यांच्या गरजेप्रमाणे पाणी पुरवठा करतांना थ्री फेज वीज पुरवठा मिळणे आवश्यक आहे. पण तो पुरवठा चार गावंाना मिळत नाही आणि त्यांना त्रास होतो. आष्टी उपकेंद्रातून निघालेला रुद्राणी फिडरची उच्चदाब विद्युत वाहिणी वटफळी फाट्यापर्यंत बंद आहे.ही बंद वीज वाहिणी जोडून दिल्यास पंपधारकांना वीजेच्या लपंडावाचा प्रश्न समाप्त होईल अशी मागणी वटफळी ता.हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते बापूराव जाधव पाटील यांनी केली आहे.