भाजीपाला मार्केटमध्ये पत्नीला पेटवले

नांदेड(प्रतिनिधी)-तीन अपत्ये असलेल्या आपल्या पत्नीला भर बाजारात पेट्रोल टाकून पेटवून टाकण्याचा प्रकार किनवट भाजी मार्केटमध्ये शनिवारी घडला. पत्नीला पेटवून नवरा फरार झाला.
दत्तनगर गोकुंदा येथील एक 35 वर्षीय महिला आपल्या घरासाठी साहित्य खरेदी करावे म्हणून किनवट येथील भाजीपाला मार्केट येथे आली. तिने आपल्या घरात लागणारे साहित्य खरेदी करून परत ती हळूहळू परतीच्या प्रवासावर असतांना तिचा नवरा येथे आला. त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या हल्यानंतर नवरा अर्जुन येथून पळून गेला. पण तेथील दुकानदारांनी ती आक विझवली. परंतू तो पर्यंत ती महिला बरीच भाजली होती.आपल्याच पत्नीला सार्वजनिकरित्या पेटवून देण्यामागे काय कारण आहे याचा उलगडा अद्याप झालेला नाही. किनवट पोलीस याबाबत पुढील तपास करीत आहेत. जाळण्याचा प्रयत्न केलेल्या महिलेला तीन अपत्ये असल्याची माहिती सांगण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *