नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील भंडारी कुटूंबियांवर वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या शिवाजीनगर भागातील तीन ते पाच प्रतिष्ठाणावर आयकर विभागाने आज सकाळी अक्षय तृतीयेचा सुर्योदय होण्याअगोदरपासून छापा टाकला आहे. तपासणी सुरू आहे.
आज पहाटे होण्याच्या अगोदर लिंबगावकडून नांदेडकडे एका मागे एक अशा चार ते पाच खाजगी कंत्राटदार वाहतुक गाड्या आल्या. त्यामध्ये अनेक लोक बसलेले होते. त्या सर्व गाड्या शिवाजीनगर भागातील वेगवेगळ्या ठिकाणी थांबविण्यात आल्या आणि त्यातील चालक वगळता इतर सर्व मंडळी या भागातील प्रतिष्ठीत कुटूंबिय भंडारी यांच्या वेगवेगळ्या तीन ते पाच प्रतिष्ठांवर पोहचली. यामध्ये पोलीस विभागातील अंमलदार सुध्दा आहेत. हे अंमलदार परभणी जिल्हा पोलीस दलाचे आहेत.
भंडारी कुटूंबियातील तीन भावांचे वेगवेगळे फायनान्स आहेत. त्या सर्व फायनान्सवर ही आयकर विभागाची तपासणी सुरू आहे. कोणताही अधिकारी किंवा कोणताही व्यक्ती बाहेरच्या माणसाला काही बोलत नाहीत, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. याला काही वाईट माणण्याचे काही कारण नाही कारण त्यांची पध्दत याच प्रकारची असते. तपासणी पुर्ण झाल्यानंतर आयकर विभाग स्वत: या ठिकाणी आम्ही काय केले. काय चुकीचे मिळाले आणि काय कार्यवाही केली याची माहिती देतील सध्या तरी सुरु असलेल्या आयकर विभागाच्या कार्यवाहीमुळे शिवाजीनगर भागात विविध चर्चांना उधान आले आहे.