नांदेड(प्रतिनिधी)-कॉंगे्रेसमध्ये काही जण सुपारी घेवून फिरत आहेत. मी त्यांना ओळखल आहे. मी त्यांची सुपारी अशी फोडणार की… अशा शब्दात कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर नांदेड लोकसभा मतदार संघातील उमेदवार माजी आ.वसंत चव्हाण यांच्या प्रचारासाठी नाना पटोले नांदेडला आले होते. यावेळी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांच्यासह उमेदवार वसंत चव्हाण, महाविकासआघातील इतर मंडळी हनमंत पाटील बेटमोगरेकर, आ.मोहन हंबर्डे, ईश्र्वरराव भोसीकर, शाम दरक, सुभाष रायबोले, अब्दुल सत्तार, महसुद अहेमद, बंडू खेडकर, सोपान मोरे, हबीब मौलाना, डॉ.वजाज मिर्झा, अब्दुल गफार, बंडू खेडकर, बी.आर.कदम, डॉ.सुनिल कदम, शेख मुन्तजिबोद्दीन, सुभाष लोणे यांचीही पत्रकार परिषदेत उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले की, अगोदर मुख्यमंत्री आणि नंतर मंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांनी आदर्शमुळे आणि 150 कोटीच्या कर्जासाठी कॉंगे्रसला धोका दिला. याची जाणिव आम्हाला अगोदरच झाली होती आणि खरीच ठरली. त्यांच्यासोबत अनेकांनी कॉंगे्रस सोडली. तरी पण नांदेड लोकसभा मतदार संघ हा पुर्वी सुध्दा कॉंग्रेसचा गड होता, आजही आहे आणि पुढेही राहिल. पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या टप्यातील पाच जागा आम्ही जिंकू. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागा महाविकास आघाडी जिंकेल असे नाना पटोले म्हणाले. कॉंगे्रस सोडून कोणी गेले तर त्याचा फरक पडणार नाही हे सांगतांना स्वयंघोषित विश्र्वगुरू (अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी) नांदेडला आले असतांना सुध्दा लोक जमले नाहीत. मी मागील दोन दिवसांपासून नांदेड लोकसभा मतदार संघाच्या विविध भागांमध्ये फिरत आहे. तेंव्हा मी लिंबगावचा रस्ता पाहिला. तो रस्ता का आडवला गेला हे नांदेडकरांना माहित आहे. सव्वाशे कोटीचा रस्ता आता 200 कोटीचा झाला आहे.
निवडणुकीच्या या कालखंडात काही कलावंत आमच्याकडे सुपारी घेवून फिरत आहेत. मी त्यांना ओळखल आहे. त्यांची सुपारी मी अशी काही फोडणार आहे की.. अशा शब्दात नाना पटोले यांनी आपला राग त्या कलावंतांवर व्यक्त केला.