मतदान जनजागृतीसाठी ‘सीईओ’नी केले डॉक्टरांना आवाहन

नांदेड – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज देगलूर येथील आय एम ए आणि निमा या डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्‍न झाली.

या बैठकीत लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देगलूर शहरातील 11 मतदान केंद्रात 50 टक्केपेक्षा मतदान कमी झाले होते. त्याठिकाणी डॉक्टर संघटनेच्या पदाधिका-यांनी जनजागृतीच्या कामात योगदान द्यावे, असे आवाहन सीईओ मीनल करनवाल यांनी केले.

 

देगलूर तहसील कार्यालयातील स्वीप कक्षाच्यावतीने देगलूर शहरातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टराना मतदान जनजागृतीच्या राष्ट्रीय कार्यात सर्व सक्रीय योगदान द्यावे अशी विनंती स्वीप कक्षाच्यावतीने करण्‍यात आली. त्यानुसार 26 एप्रिल 2024 रोजी होणा-या नांदेड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी येथील डॉक्टरानी विशेष पुढाकार घेतला आहे.

 

देगलूर शाखेतील सर्व डॉक्टरांनी आम्ही मतदान करणारच असा संदेश फलक घेऊन देगलूर शहरात जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे. मतदारांना प्रोत्साहन म्हणून जे मतदार 26 एप्रिल 2024 ला मतदान करून बोटाची शाई दाखवतील त्यांच्या तपासणी शुल्कामध्ये 30 टक्के डिस्काउंट देण्याची घोषणा देगलूर आयएमए शाखेने केली आहे.

 

इंडियन मेडिकल असोशियेशन देगलूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मुक्ता विनायकराव मुंडे, सचिव डॉ. पूजा सचिनराव गायकवाड , कोषाध्यक्ष डॉ. गीता रमेशराव रेखावार. तसेच डॉ. सचिन गायकवाड डॉ. बामणे श्रद्धा, डॉ उत्तम इंगोले , डॉ.रमेश रेखावार डॉ. काटमपल्ले, डॉ सलगरकर, डॉ कोंपलवार हेमंत व अन्य सर्व डॉक्टर विशेष परिश्रम घेत आहेत. यावेळी डॉ. सुरेंद्र आलूरकर डॉ. आशुतोष सदावर्ते, डॉ. संतोष चिंतलवार डॉ. बालूरकर , डॉ. नामावार डॉ. पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *