विष्णुपूरीत समाधानकारण पाणी साठा ; नांदेडकरांनी पाणी काटकसरीनेच वापरावे

नांदेड(प्रतिनिधी)-एकीकडे जिल्ह्यात तिव्र पाणी टंचाई जाणवत असतांना नांदेड शहरात मात्र पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नसल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. कारण विष्णुपूरीत 40 टक्के पाणी साठा असून हा नांदेडकरांसाठी आगामी 4 महिने पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध असला तरी नांदेडकरांनी पाण्याचा वापर काटकसरीनेच करावा असे आवाहन नांदेड महानगरपालिका प्रशासनाने केल आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने व पर्जन्यमानही समाधानकारक झाले नसल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची तिव्र टंचाई जाणवत आहे. सध्या स्थिती जिल्ह्यात काही ठिकाणी टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पण नांदेडकरांसाठी मात्र पाण्याच्या बाबतीत मात्र आनंदाचीच बातमी आहे. नांदेडकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयात सध्यास्थितीत 40 टक्के पाणी साठा आहे. 32.21 दलघमी पाणीसाठी उपलब्ध आहे. याच बरोबर उर्ध्व पैनगंगा इसापूर धरणात 6 दलघमी पाणी आरक्षीत असून आणीबाणीची वेळ आल्यानंतर या ठिकाणच आरक्षीत पाणी नांदेडकरांना मिळू शकते. पण विष्णुपूरीतच मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे आरक्षीत पाण्याला हात लावण्याची वेळ नांदेडकरांना येणार नसल्याची वेळ सध्याच्या चित्रावरून दिसून येते.

मागील झालेल्या अवकाळी पावसाने नांदेडकरांना दिलासाच दिला. रिकाम्या झालेल्या विष्णुपूरी प्रकल्पात अवकाळी पावसाने 70 ते 80 टक्के पाणी साठा विष्णुपूरीमध्ये झाला होता. उन्हाची तिव्रता अधिक असल्यानंतर 3 महिने पाणी पुरेल एवढा पाणी साठा विष्णुपूरी जलाशयात आहे. सध्या दोन दिवसाआढ नांदेडकरांना पाणी मिळत असल तरी नांदेडकरांनी मात्र पाण्याचा वापर काटकसरीनेच करावा कारण पर्जन्यमान जर वेळेवर झाल नाही. तर याच पाण्यावर नांदेडकरांना आपली तहान भागवावी लागणार आहे असे आवाहन नांदेड महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *