नांदेड लोकसभेसाठी 10 हजार 340 कर्मचारी; अनेक कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम नकोचचे चित्र

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा हा तीन लोकसभा मतदार संघात विभागला गेला आहे. यासाठी 3 हजार 47 बुथ असून 13 हजार 500 कर्मचारी यासाठी नियुक्ती करण्यात आले आहेत. यात नांदेड लोकसभेसाठी 2 हजार 68 बुथ असून 10 हजार 300 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण अनेक कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय कारण दाखवून आपल्याला निवडणूकीची नोकरीच नको अस चित्र निवडणुक विभागाकडे आलेल्या तक्रारीवरुन स्पष्ट दिसून येते.

लोकसभा निवडणुक नांदेड जिल्ह्यात दोन टप्यात पार पडत आहे. यात पहिल्या टप्यात नांदेड आणि हिंगोली या लोकसभेचा समावेश आहे. यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर लोहा विधानसभा मतदार संघ हा लातूर लोकसभेत आहे. यासाठी 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकंदरीत 3 हजार 47 बुथ नांदेड जिल्ह्यात आहेत. यासाठी निवडणुकीच्या बुथ प्रक्रियेच्या कामासाठी 13 हजार 500 कर्मचारी लागणार आहेत. यामध्ये नांदेड लोकसभेसाठी 10 हजार 340 कर्मचारी लागणार आहेत. पण अनेक कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय कारणे समोर करून निवडणुकीच्या कामकाजातून काढता पाय घेण्याचा मार्ग अवंलबला आहे. पण निवडणुकीचे कामकाज करण्यासाठी या कर्मचाऱ्यांन 3 प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिल जात. पहिल प्रशिक्षण पार पडल असून दुसर प्रशिक्षण आता 15 आणि 16 एप्रिल रोजी आणि तिसर प्रशिक्षण शेवटच्या टप्यात 24 आणि 25 एप्रिल रोजी पार पडणार आहे. निवडणुकीचे कामकाज करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागते. पण अनेक कर्मचारी मला निवडणुकीच कामकाजच नको असा हट्ट धरत आहेत. दररोज शेकडो अर्ज कामकाज नको म्हणून कर्मचारी निवडणुक विभागात दाखल करत आहेत आणि निवडणुक विभागही आलेले प्रत्येक अर्ज ठेवून घेवून त्यावर निर्णय देत नाही. जर कर्मचाऱ्याला कामकाज नको असेल तर निवडणुकीच काम कोण कराव असा प्रश्नही प्रशासनाच्या समोर पडला आहे. प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. जर निवडणुकीच्या कामकाजात निष्काळजीपणा केल्यास कर्मचाऱ्यावर गंभीर स्वरुपाची कार्यवाही होवू शकते असे निवडणुक प्रशासनाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *