नांदेड(प्रतिनिधी)- हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 8 ते 11 एप्रिल या चार दिवसांसाठी नांदेड जिल्ह्यात एलो अलर्ट जारी झालेला आहे. त्या अर्लटनुसार आज सायंकाळी 5 वाजेल्यापासून जोराचे वारे वाहु लागले आणि सायंकाळी 6 वाजता ढगांच्या कडकडाटांसह पावसाची सुरूवात झाली आहे.
हवामान दिलेल्या अंदाजानुसार आज सायंकाळी चार वाजल्यापासून नांदेड शहरात जोरजोरात वारे वाहु लागले. सायंकाळी 6 वाजता ढगांच्याा कडकडाटांसह रिमझीम पाऊस सुरू झाला आहे. पाऊस 5 ते 7 मिनिटच पडला परंतू वृत्त लिहिपर्यंत थेंब-थेंब पाऊस सुरूच आहे. आकाश ढगांनी भरलेले आहे आणि पुढे सुध्दा पाऊस येण्याची शक्यता दिसत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जनतेने घराबाहेर जाण्यासााठीचा प्रवास करतांना परिस्थितीकडे लक्ष ठेवून आपला निर्णय घ्यावा जेणे करुन कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यांच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सुध्दा अशीच परिस्थिती आहे. उकाड्याने त्रासलेल्या नागरीकांना मात्र या थोड्याशा पावसाने का होईला थोडासा दिलासा दिला आहे.