नांदेड(प्रतिनिधी)-बचत गटांकडून परत जाणाऱ्या लोकांना लुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यातच एक प्रकार सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 मार्च रोजी घडला. त्यात एकूण 1 लाख 29 हजार 741 रुपयांच्या ऐवजाची लुट झाली.
प्रविण एकनाथराव कवरे हे भारत फायनान्सचे फिल्ड सहाय्यक आहेत. दि.3 एप्रिल रोजी त्यांनी सायफळ ता.माहुर येथे महिला बचत गटांकडून पैसे वसुल करून ती बॅग मोटारसायकल क्रमांक एम.एच.27 सी.ए.7381 ठेवून सायफळ ते गोकुळ रस्त्यावर जात असतांना खडी केंद्रासमोर दोन माणसे अचानक त्यांच्या दुचाकीसमोर आली आणि त्यामुळे दुचाकी थांबवावी लागली. आलेल्या लोकांनी त्यांच्या डोळ्यात मिर्ची पुड टाकले आणि काठीने डोक्यात मारले. ते खाली पडले तेंव्हा 1 लाख 22 हजार 741 रुपये रोख रक्कम असलेले बॅग आणि त्यात 7 हजार रुपयांचा टॅब होता ती बॅग बळजबरीने चोरून नेली आहे. एकूण लुट झालेल्या ऐवजाची किंमत 1 लाख 29 741 रुपये आहे. सिंदखेड पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 392 नुसार गुन्हा क्रमांक 30/2024 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे हे करीत आहेत.