शक्तीप्रदर्शन करत वसंत चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-योगा-योगाने सध्या वसंतऋतु सुरू आहे. यामुळे या ऋतुत झाडांची पान गळ होती आणि नवीन पालव्या फुटतात त्याचप्रमाणे अशोकाची पडझड झाली आणि वसंत बहरला अस म्हणल तर वावगे ठरणार नाही. यामुळे आता नांदेडमध्ये नक्कीच वसंत चव्हाण निवडून येतील यात माझ्या मनात काही शंका नाही असे अमित देशमुख यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीचे नांदेड लोकसभा मतदार संघातील उमेदवार वसंत बळवंतराव चव्हाण यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर हिंगोली गेट येथील गुरुद्वारा मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत माजी मंत्री देशमुख बोलत असतांना म्हणाले की, देशात काय चालू आहे. नांदेड आणि लातूर यांच्या पिढ्यान पिढ्या नात आहे. कै.शंकरराव चव्हाण यांनी कै.विलासराव यांना घडविल. थोडक्यात नांदेडने लातूरला घडविल अस म्हणत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मला नांदेडला प्रचार करायला याव लागेल अस कधी वाटल नाही. पण तुम्हने पुकारा और हम चले आऐ। जान हाथेली पे लेकर आऐ। अशा अशा शब्दात अमित देशमुख यांनी सांगितले. अशोक चव्हाण नसले तर काय झाले आपल्याकडे वसंत चव्हाण आहेत. ही निवडणुक सामान्य माणसांनी हाती घेतली आहे. तेंव्हा सामान्य व्यक्ती एखादी निवडणुक हातात घेतो तेंव्हा धनदांडग्या शक्तीचा निश्चितच पराभव होतो. मराठवाड्याची भुमी ही क्रांतीकारी भुमी आहे. यामुळे या ठिकाणचा सर्वसामान्य मतदार महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहे. येणाऱ्या काळात निश्चितच मराठवाड्यावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा मी विश्र्वास व्यक्त करतो.
महाराष्ट्राला एक परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण ते उध्दव ठाकरे यांच्या पर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी विचाराची आणि सर्वसामान्यांच्या विकासाची लढाई लढली. त्यांनी कधी फोडाफोडीच राजकारण केल नाही. पण अलीकडच्या काळात आता देशातला असा एकही पक्ष नाही की, तो भाजपानी फोडला नाही. या फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य जनता आता वैतागली आहे. मतदाराला आता इट आला आहे अशा शब्दात माजी मंत्री अमित देशमुख यांनी भाजपावर हल्ला चढवला.
दुपारी 12 वाजेच्यासुमारास जुना मोंढा टावर येथून महाविकास आघाडीची रॅली सुरूवात झाली. या रॅलीत घोड्याच्या रथावर उमेदवार वसंत चव्हाण माजी मंत्री अमित देशमुख, आ.मोहनअण्णा हंबर्डे हे स्वार झाले होते. तर या निवडणुकीत मोठ्याप्रमाणात महाविकास आघाडीचे मतदार सहभागी झाले होते. विशेष आकर्षण म्हणून बैलगाडीचाही सहभाग शेतकऱ्यांनी नोंदवला होता.
वसंत चव्हाण भावूक झाले
ही निवडणुक नांदेडच्या ईतिहासात नोंद करणारी आहे. आज माझ्या विनंतीला तुम्ही मान देवून इथे आलात मी अगोदर तुम्हाला वंदन करतो असे म्हणून त्यांनी सर्वांना त्यांनी साष्ठांग नमस्कार केला. ही निवडणुक मी सर्व सामान्यांच्या जिवावर लढवित आहे. जे गेले ते कावळे असतील पण येथे जमलेला हा सर्व चिमन्यांचा बाजार आहे. अस म्हणत त्यांनी मतदारांना आवाहन केल. जे गेले ते एकटेच गेलेत त्यांच्या सोबत कोणीही गेल नाही. त्यांच्या अडचणी काय होत्या ते मला माहित नाही. पण कॉंगे्रसने 70 वर्षापासून त्यांच्यावर प्रेम केल होत आणि सर्व देवूनही ते सोडून गेले. मी शरिराने थकलो नाही. विरोधकांच्या पायाखालील वाळू घसरत असल्याने ते काहीही अफवा पसवित आहेत असे म्हणून त्यांनी सर्वांसमोर दंड थोपटून विरोधकांना कुस्ती खेळण्याचे आव्हाण दिले आहे. मी लेचा-पेचा नाही अस म्हणून त्यांनी दादागिरीची उत्तर दादागिरीनच दिल जाईल. मी सर्वसामान्य कुटूंबातील कार्यकर्ता आहे. माझ्याकडे एकच मोबाईल आहे. माझा मोबाईल 24 तास चालू असतो अस म्हणत त्यांनी जाहीर सभेत मोबाईल नंबर मतदारांसाठी सांगितला. हे सांगत असतांनाच ते भावूकही झाले.