नांदेड – वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते 1 एप्रिलपासून बदलणार आहेत. मार्च महिन्यात दस्तऐवज नोंदणीसाठी होणारी गर्दी व आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने, तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना या संबंधीचे कामकाज व दस्त नोंदणीसाठी आलेल्या सुट्ट्या लक्षात घेता जनतेच्या सोयीच्या दृष्टीने दस्त नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च 2024 रोजी सुरु राहणार आहेत. संबंधीतांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र. बोराळकर यांनी केले आहे.
More Related Articles
इतवारा पोलीसांनी एका चार चाकी वाहनात 8 लाख रुपये पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-बर्की चौक भागात 8 नोव्हेंबर रोजी पोलीसांनी केलेल्या एका तपासणीत एका बंद बॉडीच्या चार चाकी…
ईव्हीएम मशीन का बदलल्या याचा जाब विचारण्यासाठी वंचितचे सोमवारी धरणे आंदोलन
नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा मतदारसंघात दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले मात्र ऐन मतदानाच्या दिवशीच…
आठ वर्षाच्या अब्दुल खादर ने पूर्ण केला पहिला रोजा
नांदेड(प्रतिनिधि)-इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून, खडकपुरा नांदेड येथील अब्दुल खादर…