भोकर,(प्रतिनिधी)- राष्ट्रीय हत्तीरोग दुरीकरण मोहीम नांदेड जिल्ह्यातील दहा तालुक्यात किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, कंधार,नायगांव, बिलोली, देगलूर, मुखेड तालुक्यातील गावामध्ये दि.२६ मार्च ते ५ एपिल २०२४ या कालावधीत मोहिम राबविण्यात येणार आहे.
नांदेड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्ह्य़ातील आज दहा तालुक्यातील गावामध्ये बुथवर वयोमानानुसार डिईसी गोळ्या व अलबेंडाझॉल गोळ्या खाऊ घालण्यात आले. जिल्हास्तरीय उद्घाटन मौजे नारवट तालुका भोकर येथील शाळेत विद्यार्थी, सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी समक्ष गोळ्या खाऊन मोहिमची सुरुवात करण्यात आली.
यावेळी राज्यस्तरीय अधिकारी डॉ प्रेमचंद कांबळे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हत्तीरोग) पुणे, डॉ वैशाली तांभाळे मॅडम सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) लातूर, डॉ महेंद्र जगताप राज्य किटकशास्त्रज्ञ पुणे, नांदेड जिल्हा राज्यस्तरीय पथक प्रमुख सोमाजी अनुसे राज्य किटकशास्त्रज्ञ पुणे हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. डॉ संतोष सुर्यवंशी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा हिवताप अधिकारी नांदेड यांनी हत्तीरोग दुरिकरण मोहीम विषयी सविस्तर माहिती दिली व प्रास्ताविक केले. डॉ महेंद्र जगताप, डॉ वैशाली तांभाळे मॅडम व सोमाजी अनुसे सर यांनी हत्तीरोग दुरीकरण मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले तसेच सर्व नागरिकांनी वयोमानानुसार डिईसी व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा कर्मचारी यांच्या समक्ष खावावी. सध्या रमज़ान महिना चालू आहे मुस्लिम नागरिकांनी रोजा सोडल्या नंतर गोळ्या खावावेत असे आवाहन केले.
सदरील कार्यक्रमाचे नियोजन डोॅ दिपक कदम तालुका आरोग्य अधिकारी भोकर, प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हत्तीरोग आरोग्य निरीक्षक व्यंकटेश पुलकंठवार व आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) सत्यजीत टिप्रेसवार यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ बसवंते, डॉ. निलावार, डॉ हामंद, डॉ जंगीलवाड सीएचओ, सरपाते पुणे येथील विकास शिंदे किटक समाहारक, सहाय्यक संचालक लातूर कार्यालयातील डॉ अकोलकर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य निरीक्षक सचिन कुलकर्णी, किटक समाहारक अखिल कुलकर्णी, आरोग्य सेवक चंद्रभान धोंडगे, आरोग्य निरीक्षक एम ऐ सय्यद, सुरेश पाईकराव, रहिम खान, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर येथील अतुल आडे, विजय क्षीरसागर, गजानन तमलवाड, राजेश चव्हाण,संघशेन गजभारे, प्रतिजा सरपाते, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदि उपस्थित होते.