नांदेड(प्रतिनिधी)-बनावट प्रकारचा सुर्यछाप तोटा विकणाऱ्या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून बनावट व्ही.एच. पटेल ऍन्ड कंपनीचे लोगो, बनावट सुर्यछाप तंबाखु तोटा, बनावट शिक्के असा 1 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे देण्यात आला.
नांदेड येथील व्ही.एच.पटेल ऍन्ड कंपनीचे वितरक बाबुलाल गंगाचरण अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही जण 40 गाव येथील या कंपनीचे बनावट लोगो, चिन्हे, अकृत्या आणि नावे वापरुन बनावट सुर्यछाप तंबाखु तोटा विक्री करत आहेत. त्यानुसार शेख युसूफ जानीमियॉ रा.बोंढार हवेली, शेख गौस शेख इब्राहिम रा.माळटेकडी रस्ता गौस पठाण बशीर पठाण रा.धनेगाव, बशीर खान दौलत खान पठाण रा.धनेगाव आणि इमरान या लोकांची तपासणी करून त्यांच्याकडून 1 लाख 17 हजार 500 रुपये किंमतीचे बनावाट लोगो आणि बनावट तोटा जप्त करण्यात आला.
हा सर्व प्रकार 22 मार्च रोजी सायंकाळी शेख युसूफ जानीमियॉं यांच्या मिलत्तनगर येथील घरात घडला. या पाच जणांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 471, 482, 483, 486, 487 आणि 34 सोबत कॉपीराईट कायदा 1957 मधील कलम 51 आणि 36 नुसार गुन्हा क्रमांक 225/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक आरसेवार यांच्याकडे देण्यात आला आहे.