निवडणूकीसाठी प्रशासन सज्‍ज, आचारसंहितेचे पालन करा

नांदेड – भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्‍यानुषंगाने निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या निवडणूकीसाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्‍ज झालेली आहे. 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्धझालेल्‍या  मतदार यादीनुसार 86-नांदेड विधानसभा मतदार संघात एकुण  मतदारसंख्‍या 3 लाख 39 हजार 140एवढी असुन  पुरुष मतदार संख्‍या 1 लाख 74 हजार 852 (51.56 टक्के) व स्‍त्री मतदार संख्‍या  1 लाख 64 हजार 190 (48.47 टक्के) तर  इतर मतदार संख्‍या 98 एवढी आहे.  ज्येष्‍ठ नागरीकांची मतदार संख्‍या  4 हजार 389 एवढी आहे. तर सेनादल  मतदारांची संख्‍या 154 एवढी आहे.  दिव्‍यांग मतदार संख्‍या  1 हजार 685 ( पुरुष 966, स्‍त्री 719) एवढी आहे. नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघात एकुण 348 मतदान केंद्रे असुन 6 सहायक  मतदान केंद्रे आहे. तर 18-19 वयोगटातील नवमतदारांची संख्‍या  4 हजार 441 एवढी आहे.

नांदेड उत्‍तर  विधानसभा  मतदार संघामध्‍ये एकुण 31 झोन निश्चित करण्‍यात आलेले असून त्‍यासाठी 31 क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्‍यासाठी  4  S.S.T पथके आलेगाव चेकपोस्‍ट, लिंबगाव चेकपोष्‍ट, आसना चेकपोष्‍ट व कासारखेडा या चेकपोष्‍टवर पुरेशा मनुष्‍यबळासह तैनात करण्‍यात आलेली असुनया चेकपोस्‍टवर येणाऱ्या वाहनांची कसुन तपासणी करण्‍यात येत आहे. तसेच 4 Flying Squad देखील तैनात करण्‍यात आलेली आहेत. नांदेड उत्‍तर मतदार संघात होणाऱ्या  विविध पक्षांचे कार्यक्रम, सभा, इत्‍यादीवर देखरेख ठेवण्‍यासाठी 4 V.S.T कक्ष  स्‍थापन करण्‍यात आलेले आहेत. मतदारांमध्‍ये मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यासाठी स्‍वीप कक्षाची स्‍थापना करण्‍यात आलेली आहे. प्रत्‍येक मतदान केंद्रावर  पिण्‍याची पाणी,  दिव्‍यांगासाठी रँप,  स्‍तनदा मातांसाठी  स्‍वतंत्र व्‍यवस्‍था व प्रतिक्षालय उभारण्‍यात येणार आहे.

निवडणूकीसाठी  नियुक्‍त करण्‍यात आलेले S.S.T, F.S.T.VST.VVT पथके, क्षेत्रिय अधिकारी व सर्व अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्‍यात आलेले आहे. नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण 30 मार्च 2024 रोजी सचखंड पब्‍लीक स्‍कुल, गुरुग्रंथ साहिब भवन नांदेड येथे  आयोजीत करण्‍यात आलेले आहे. त्‍यामध्‍ये मतदानासाठी नियुक्‍त अधिकारी व कर्मचारी यांना  प्रशिक्षण देण्‍यात  येणार आहे.

निवडणूक काळात 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्‍यात येत असून सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करुन मतदान प्रक्रिया शांततेत, निस्‍पृह वातावरणात पार पाडावी  तसेच  सर्व मतदारांनी  उत्स्‍फुर्तपणे  मतदान करावे, असे आवाहन  निवडणूक निर्णय अधिकारी व  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  86- नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे  केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!