लोकसभेच्या मुहूर्तावर रुकम्या डाकू लॉंचिंगच्या धडपडीत

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि नांदेड येथील एका सर्वसामान्य पत्रकाराचे निधन झाले. त्या पत्रकाराप्रति संवेदना व्यक्त करणे तर सोडाच त्याचे नाव ही न घेणाऱ्या रुकम्या डाकूने त्याच्या मड्यावरचे लोणी खाण्यास सुरूवात केल्याची खात्रीलायक माहिती आहे. ही सर्व धडपड मोगलीचे गाणे जिल्हाभर गाजावे यासाठी आहे असे सांगण्यात येते. एका वृत्तवाहिनीने त्याच्या पार्श्र्वभागावर लाथ मारल्यानंतर मी स्वत:ची वृत्तवाहिनी सोडली असे सांगून मयत पत्रकाराची जागा घेण्याची ही घाणेरडी धडपड सर्वांना माहित आहे.
नांदेड जिल्ह्यात रुकम्या या डाकूचे नाव प्रसिध्द आहे.रुकम्या हा मुळात गंगाखेड तालुक्यातील रहिवासी होता. त्याचे नाव डाकू होते पण त्याच्यातील काही चांगल्या बाबी आजही प्रसिध्द आहेत. पण तो डाकू असल्याने चांगल्या बाबी मागे पडल्या आणि डाकू हे नाव कायम राहिले. नांदेड जिल्ह्यात वृत्तवाहिन्यांचे चलन आले तेंव्हा त्यात एक छोटासा डाकू घुसला. हळूहळू आपला जम बसवत तो स्वत:च स्वत:ला रुकम्या डाकू म्हणू लागला. रुकम्या डाकूमध्ये काही बाबी चांगल्याही होत्या. पण वृत्तवाहिनीमधील या रुकम्या डाकूमध्ये एकही चांगली बाब नाही. तरी पण तो वृत्तवाहिनी गटात म्होरक्या बनला.
मागील तिन वर्षापासून त्याच्या हाताखाली काम करतांना एक पत्रकार कृषी बातम्यांसाठी दररोज 70 ते 80 किलो मिटर फिरायचा. आपला कॅमेरामन आहे असे रुकम्या डाकू त्याच्याबद्दल बोलायचा.पण पुढे तो पत्रकार आपल्या मेहनतीच्या बळावर स्वत:चे अस्तित्व निर्माण करून जगू लागला होता.पण दुर्देवाने काही दिवसांपुर्वी त्या पत्रकाराचा मृत्यू झाला. त्या पत्रकाराच्या कुटूंबियांना जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अनेक लोकांनी आर्थिक मदत केली. रुकम्या डाकूने त्या पत्रकाराबद्दल साधी संवेदनासुध्दा व्यक्त केली नाही आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याची जागा बळकावण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
आम्ही बातमी प्रसारीत करीपर्यंत रुकम्या डाकूला त्या पत्रकाराची जागा पुर्णपणे मिळाली नव्हती.तरीपण त्याची धडपड पाहता लोकसभा निवडणुकीतील पॅकेज मिळावे यासाठी ही धडपड आहे असे दिसते. सोबतच मोगलीच्या मदतीला कोणी शिल्लक राहिला नव्हता. रुकम्याच्या आगमनाने मोगलीचे गाणे जंगलमध्ये गाजले होते आता ते गाणे नांदेड जिल्ह्यात गाजावे यासाठी रुकम्या डाकू त्याला मदत करेलच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *