दोन महिला आणि तीन पुरूषांना दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-निर्वस्त्र करून पुरूषांची फसवणूक करणाऱ्या दोन महिला आणि तीन पुरूषांच्या टोळीला आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली सोयंके यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
भोकर येथील एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने विशाल हरीश कोटीयन(33), नितीन दिनेश गायकवाड (28), सुनिल ग्यानोबा वाघमारे(34), निता नितीन जोशी(27), राधिका रुपेश साखरे (25) यांना अटक करून तपासासाठी पोलीस ठाणे भाग्यनगर येथे दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 98/2024 या प्रकरणात हस्तांतरीत केले.
आज भाग्यनगरचे पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख, पोलीस अंमलदार प्रदीप गर्दनमारे, ओमप्रकाश कवडे, कदम आणि महिला पोलीस अंमलदार जमदाडे यांनी पकडलेल्या तीन पुरूष आणि दोन महिलांना न्यायालयात हजर केले. या प्रकरणातील आरोपींकडून असे दुसरे काही प्रकार केले आहेत काय? याचा शोध घेणे आहे असा युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायाधीश सोनाली सोयंके यांनी पाच जणांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…

पुरुषांना निर्वस्त्र करून खंडणी उकळणारी दोन महिलांसह पाच जणांची टोळी गजाआड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *