नांदेड(प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनी 50 हजारांची लाच स्विकारणारा डॉक्टर विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविला आहे. नवरा पोलीस कोठडीत गेल्यानंतर फरार असलेली डॉक्टर पत्नी ही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्या अडकली. तिला पोलीसांनी आाज सायंकाळी 5 वाजता अटक केली आहे.
डॉक्टरलेनमध्ये असलेल्या अर्पण रक्तपेढीची तपासणी करण्यासाठी 7 मार्च रोजी डॉ.अश्र्विनी किशनराव गोरे ह्या धाराशिव येथून आल्या होत्या. रक्तपेढीची तपासणी झाल्यानंतर तुमच्या रक्तपेढीत असलेल्या त्रुटी पुढे पाठवायच्या नसतील तर 1 लाख 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्या दिवशी अर्पण रक्तपेढीवाल्यांनी डॉ.अश्र्विनी गोरे यांना 10 हजार रुपये दिले आणि जागतिक महिला दिनी अर्थात 8 मार्च 2024 रोजी लाचेचे उर्वरित 1 लाख रुपये घेण्यासाठी आपला नवरा डॉ.प्रितम तुकाराम राऊत यास पाठविले. डॉ.प्रितम राऊत हे सुध्दा अस्थिरोग तज्ञ असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कार्यरत आहेत. डॉक्टरला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणारी महिला डॉक्टर हिला अटक केली आहे.
डॉ.प्रितम राऊतने अर्पण रक्तपेढीवाल्यांना लाचेचे पैसे देण्यासाठी नांदेडच्या पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर बोलावले. तेथे अर्पण रक्तपेढीवाल्यांनी 50 हजार रुपये दिले. त्यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ.प्रितम राऊतला अटक केली. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार आपल्या नवऱ्याला अटक होताच डॉ.अश्र्विनी गोरे फरार झाल्या. डॉ.अश्र्विनी किशन गोरे आणि तिचा नवरा डॉ.प्रितम तुकाराम राऊत (48) या दोघांविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखूल केला.
आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील, गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक गजानन बोडके, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, प्रकाश मामुलवार, गजानन राऊत, बालाजी मेकाले यांनी पकडलेल्या डॉ.प्रितम तुकाराम राऊतला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांच्या समक्ष हजर करून तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. डॉ.प्रितम राऊतच्यावतीने ऍड.संदीप पवार यांनी सादरीकरण करतांना पोलीस कोठडीचा विरोध केला. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी डॉ.प्रितम तुकाराम राऊत (48) यास पाच दिवस अर्थात 14 मार्च 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
न्यायालयाने डॉ.प्रितम राऊतला पोलीस कोठडी दिल्यानंतर प्राप्त झालेल्या माहितीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणारी महिला डॉ.अश्र्विनी किशनराव गोरे हिला अटक केली आहे. यासाठी पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार, पोलीस निरिक्षक प्रिती जाधव, पोलीस अंमलदार उलका जाधव, दिपीका शिंदे, विजय नकुलवार, सय्यद अर्शद, प्रकाश मामुलवार यांनी रात्रभर मेहनत करून लाच मागणाऱ्याा महिलेला आज अटक केली आहे.
संबंधीत बातमी….
जागतिक महिलादिनी डॉक्टर महिला आणि तिचा पती अडकले 50 हजारांच्या लाच जाळ्यात