नांदेड (प्रतिनिधी)-नेवरी ता.हदगाव येथील ज्येष्ठ नागरिक गणपतराव माधवराव इंगळे (वय 65)यांचे 7 मार्च 2024 रोजी सांयकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.नांदेड न्यायालयातील प्रसिद्ध विधीज्ञ अॅड. संतोष इंगळे व नेवरीचे तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश(पिंटू पाटील) इंगळे यांचे ते वडील होत.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दि. 8 मार्च रोजी सकाळी नेवरी ता. हदगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अॅड.पी.एन.शिंदे,अॅड. सुहास नांदेडकर, दासराव हंबर्डे,अॅड. भोसले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.