नांदेड(प्रतिनिधी)-आज माघ कृष्ण त्रयोदशी अर्थात देवाधीदेव महादेव यांचा जन्मोत्सव सोहळा. अनेक शिवमंदिरांमध्ये भक्तांनी सकाळपासूनच रांग लावली. महाकालच्या स्वरुपातील महादेव तयार करून काही भक्तांनी काढलेल्या मिरवणूकीत भजनांसह बमबम भोलेच्या निनादाने आसमंत दुमदुमले.
आज महाशिवरात्री देवाधीदेव महादेवाचा जन्मोत्सव सोहळा. मध्यरात्रीनंतर पहाटे 4 वाजेपासूनच अनेक शिव मंदिरामध्ये पुजा आर्चा, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या रागांमधील वेगवेगळे शिव भजन कानी पडत होते. दुपारी गाडीपुरा भागातून भगवान महादेवाच्या पालखी आणि मुर्तीसह एक मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत महादेवांच्या भजनांवर युवक नृत्य करत होते. बमबम भोलेच्या गजराने आसमंत दुमदुमले होते. ही शिव मिरवणूक उर्वशीघाट, गोदावरी नदी येथे संपते. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मेहनत घेत होते.