पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंदोबस्तात पोलीस अंमलदार पाण्याच्या टाकीवर चढतांना खाली पडून बेशुध्द

नांदेड(प्रतिनिधी)-आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमन प्रसंगी अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी एका पोलीस शिपायाला कोणतीही सुविधा नसतांना पाण्याच्या टाकीवर जाण्यास भाग पाडले आणि तो पोलीस अंमलदार खाली पडला. सुदैवाने दोन तासाच्या बेशुध्दीनंतर तो पुन्हा ठिक झाला. घटना पाहणारे लोक सांगतात पोलीस कॉन्स्टेबल खाली पडल्यानंतर एक लाकडाची फालतू सिडी तेथे लावून फोटो काढण्यात आले.
आज भारताचे नरेंद्र मोदी नांदेड विमानतळावर आले होते. त्यानंतर काही वेळातच ते चेन्नईकडे रवाना झाले. त्या दरम्यान प्रोटोकॉल प्रमाणे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. विमानतळाजवळील कामठा गावात एक पाण्याची टाकी आहे. तेथे पोलीस अंमलदार संदीप मुंडे नेमणूक पोलीस मुख्यालय नांदेड यांची ड्युटी लावण्यात आली होती आणि त्या भागात देखरेख करणारे अधिकारी अत्यंत कर्तव्यदक्ष लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्यावर जबाबदारी होती. पाण्याच्या टाकीवर जाण्यासाठी तळमजला ते पाण्याच्या टाकीचा पहिला मजला इतरपर्यंत काहीच सोय नव्हती. वरच्या तिन मजल्यावर जाण्यासाठी लोखंडी पायऱ्या दिसतात. ओमकांत चिंचोळकर यांनी संदीप मुंडेला आदेश दिला की, सर्वात वर जा याप्रसंगी संदीप मुंडेकडे दुरबिन आणि बंदुक पण होती. वर जायला काही जागा नाही हे संदीप मुंडेने चिंचोळकर यांना सांगितले तेंव्हा अत्यंत सुंदर शब्दात संदीप मुंडेला समज देण्यात आली. त्यानंतर संदीप मुंडे कसे बसे वर चढण्याचा प्रयत्न करत असतांना खाली कोसळले. त्यांना त्वरीत दवाखान्यात पाठविण्यात आले. जवळपास 2 तास बेशुध्द अवस्थेत राहिल्यानंतर संदीप मुंडे यांना शुध्दी आली. त्या ठिकाणचे काही लोक सांगतात की संदीप मुंडे खाली पडल्यानंतर गवंडी काम करणाऱ्याकडे असलेल्या लाकडी पाट्या जोडून तेथे एक सीडी तयार करण्यात आली. संदीप मुंडे यांच्या तबेतीची विचारणा केली असता सध्या ते चांगल्या अवस्थेत आहेत. पण त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होते की, पोलीस खात्यात प्रसिध्द असलेली म्हण, “तोंड दाबून बुक्यांचाा मार’ ही पुन्हा एकदा प्रत्यक्षात दिसली. संदीप मुंडे सांगत होते की, बरे झाले जीव तर वाचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *