नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील काही भागांमध्ये आज सायंकाळी 6.21 वाजता भुकंपाचे धक्के जाणवले. पण भुकंपाची तिव्रता अत्यंत कमी होती. प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे की, घाबरण्याचे कारण नाही. प्रशासन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे.
सायंकाळी 6.21 वाजता शहरातील वर्कशॉप, श्रीनगर, काबरानगर, शिवाजीनगर आदी भागांमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. लोकांमध्ये या संदर्भाने घबराट पसरली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात असलेल्या भुकंप मापक यंत्रावर या धक्क्यांची तिव्रता 1.5 रिक्टरस्केल अशी नोंदवली गेेली. त्यामुळे भुकंपाची तिव्रता ही अत्यंत कमी आहे. प्रशासनाने सुध्दा जनतेला आवाहन केले आहे की, घाबरून जाण्याचे काही कारण नाही. या धक्यांमुळे कोणताही अनुचित प्रकार घडत नाही. प्रशासन कोणत्याही आपत्ती परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे.