नांदेड जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन; 2 हजार 767 लसीकरण केंद्रावर बालकांना डोस

नांदेड:- संपूर्ण राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 3 मार्च रोजी राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 5 वर्षाखालील बालकांना एकूण 3 लाख 99 हजार 698 पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. आज या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मुदखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मुगट येथे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. नीना बोराडे यांच्या हस्ते बालकास पोलिओचा डोस पाजून संपन्न झाले.

यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेभाऊ बुट्टे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सत्यनारायण मुरमुरे, प्रा.आ.कें. वैद्यकीय अधिकारी डॉ. कासराळीकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सुभाष खाकरे, विस्तार अधिकारी लतीफ पठाण, सिकलसेल समन्वयक दिपाली इंगोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे व इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

या मोहिमेसाठी जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण व शहरी भाग तसेच महानगरपालिका क्षेत्रातही लस 5 वर्षापर्यतच्या बालकांना देण्यात आली. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने राज्य नोडेल ऑफिसर तथा सह संचालक डॉ. रेखा गायकवाड या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी अनेक बुथला भेट देवून पाहणी केली आहे.

 

या मोहिमेत ग्रामीण भागातून 2 हजार 236 शहरी भागातून 255 तर महानगरपालिका भागात 276 असे एकूण 2 हजार 767 बूथ उपलब्ध करून दिले आहेत. या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण 7 हजार 265 कर्मचारी कार्यरत असून 25 हजार 862 लसीचे व्हायल उपलब्ध करून दिले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *