29 दिवसात वाहतुक शाखा क्रमांक 1 वजिराबादने ठोठावला 81 लाख 12 हजार 200 रुपये दंड

नांदेड(प्रतिनिधी)-फेबु्रवारी महिन्याच्या 29 दिवसात नांदेड शहराच्या वाहतुक शाखा क्रमांक 1 वजिराबादने 7 हजार 800 मोटार वाहन कायद्याचे केसेस करून त्यांच्यावर 81 लाख 12 हजार 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या वाहनधारकांकडून पोलीसांनी 32 लाख 22 हजार 100 रुपये एवढी रक्कम भरूनपण घेतली आहे. अशी माहिती वाहतुक शाखा क्रमांक 1 चे पोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे पाठविली आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाला अनुसरून नांदेड शहरातील वाहतूक शाखा क्रमांक 1 वजिराबाद यांनी फेबु्रवारी महिन्याच्या 29 दिवसांमध्ये चुकीच्या पध्दतीने वाहन चालन करणे, मोटार वाहन कायदा मोडणे, सायलेंसर मॉडीफाईड करून वापरणे अशा विविध कारणांसाठी वजिराबाद वाहतुक शाखेच्या हद्दीत एकूण 7 हजार 800 वाहनांविरुध्द कार्यवाही केली. या कार्यवाहीतून मोटार वाहन कायद्याला अभिप्रेत नियमाप्रमाणे 81 लाख 12 हजार 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यातून 32 लाख 22 हजार 100 रुपये एवढ्या रक्कमेची वसुली सुध्दा करण्यात आली. बुलेट गाडीचे सायलेंसर मॉडीफाईड करणाऱ्या 71 जणांविरुध्द या 29 दिवसांमध्ये कार्यवाही करण्यात आली आहे. बहुदा वाहतुक शाखेने 29 दिवसांमध्ये एवढी मोठी कार्यवाही करण्याची ही पहिलीच वेळ असेल. या प्रसिध्दीपत्रकासोबत पाोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणीही मोटार वाहन कायद्याच्या नियमांना न मोडता आपल्या वाहनांचे चालन करावेत. जेणे करून मोटारवाहन चालक, धारक यांच्याविरुध्द दंडात्मक कार्यवाही होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *