पुर्व भांडणाचा राग धरून युवकास चाकूने भोकसून खुन

दोन अरोपीला घेतले ताब्यात .
बहीनीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल .
उमरी ( प्रतिनिधी ) उमरी शहरातील व्यंकेशनगर येथे राहणाऱ्या युवकास मित्राच्या साह्याने गोरठा येथिल तरुनाने पोटात चाकू खुपसुन पळून गेला असुन उपचारा दरम्यान राजु रामा धोत्रे यांचा मृत्यू झाला आहे अवध्या तीन तासातच पोलिस दोन आरोपीला ताब्यात घेतले आहे सदरची घटना दि 28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता घडली आहे .
या बाबद मयताची बहीन सपना रामा धोत्रे यांनी फिर्याद दिल्या वरून पोलिस सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की राजू रामा धोत्रे वय वर्ष रा रेल्वेटेश च्या पाठीमागे व्यंकटेश नगर उमरी हा आई बहीन भावा सह उमरी येथे राहतो .
राजू धोत्रे यांचे कांही कारणास्तव गोरठा येथिल ज्ञानेश्वर चन्नपा नागदरे यांच्याशी भांडने ही झाले ते आपसात परस्पर भांडने मिटले होते परंतू ज्ञानेश्वर नागदरे यांच्या डोक्यातील राग कांही गेला नव्हता .
दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी राजू रामा धोत्रे हा व्यंकटेश नगर उमरी येथिल कंदेवाड किराणा दुकाना समोर बाजवर झोपून मोबाईल पहात असतांना ज्ञानेश्वर चिन्नपा नागदरे रा गोरठा आणि राजू शेट्टी रा उमरी यांनी मोटार सायकलवर येवून ज्ञानेश्वर नागदरे यांनी स्वतः जवळील चाकू काढून राजू धोत्रे यांच्या पोटात सपा सप वार करून पळून गेला .
सदरची बातमी मयताची बहीन सपना रामा धोत्रे, आई सर्व गल्लीत राहणाऱ्या नातेवाईकाना कळाले त्यां नातेवाईकाने घाई गडबडीत जावून राजू धोत्रे यांना जखमी अवस्थेत बाजवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसुन आला त्याच्या पोटातून रक्तस्त्राव चालू होता त्यांना घेवून उमरी ग्रामिण रूग्णालय उपचारासाठी गाठले परतू उमरी डॉक्टर प्रथम उपचार करून गंभीर जखल असल्याने नांदेड कडे पुढील उपचारासाठी पाठविले नांदेद विष्णुपुरी शासकीय दवाखान्यातील डॉक्टर त्यांना मृत्यू घोषित केले .तो पर्यंत उमरी पोलिस निरीक्षक अंकूश माने , पोलिस उपनिरीक्षक कऱ्ये , चेवले , जमादार गेडाम यांनी डी वाय एस पी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्र वेगाने फिरून अरोपी ज्ञानेश्वर चन्नपा नागदरे , त्याचा मित्र राजू शेट्टी यांना तीन तासात अटक करून कोर्टात सादर केले आहे.फियादी मयताची बहीन सपना रामा धोत्रे यांच्या तक्रारी नुसार भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 302, 34 भा .द वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास डी वाय एस पी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शना नुसार करण्यात येणार आहे अटक दोन्ही अरोपीला कोर्टात हजर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *