राजू गिरीला प्रस्तापित करण्यासाठी नागपूरकर काका खेळणार पुन्हा एक नवीन खेळी

नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्ह विरुध्द गुन्हा दाखल केल्यानंतर टी.व्ही.9 वाहिनीने राजू गिरी यांना कायमचा राम-राम केला. त्यांच्या जागी टी.व्ही.9 ने जागा दिलेल्या युवकाची उचल बांगडी करण्यात राजू गिरीला यश आले नाही. म्हणून आता नागपूरकर काका आपल्या मुलाला मदत व्हावी म्हणून एकाला काका करत होते त्या वाहिनीमधून कमी करून राजू गिरीला आण्याचे खलबत काका करत आहेत. ज्याला काढायचे प्रयत्न सुरू झाले आहेत तो कधी राजू गिरीचाच सेवक होता आणि आजही आहेच. नागपूरकर काकाचा हा दुसरा प्रयत्न आहे.
एका खाजगी व्यक्तीने केलेल्या स्टींग ऑपरेशनची बातमी वास्तव न्युज लाईव्हने छापली. त्यात राजू गिरीला प्रत्येक बातमीसाठी 500 रुपये द्यावे लागतात असे तो युवक व्हिडीओमध्ये सांगत आहे. त्यानंतर लागलीच वास्तव न्युज लाईव्हच्या संपादकाविरुध्द वजिराबादचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड यांनी जसे काही राजू गिरीचे लिहिलेले शब्द हे राजा हरीशचंद्रांसारखे आहेत असे समजून गुन्हा दाखल केला. त्यानंतर टी.व्ही.9 ने राजू गिरीची हकालपट्टी केली. त्याच्या जागी एक युवक यशपाल भोसले यांची नियुक्ती झाली. त्याला मी काढून टाकणार आहे अशा वल्गना राजू गिरीने केल्या. परंतू त्यात काही यश आले नाही.
इकडे राजू गिरीची उचल बांगडी झाल्यानंतर नागपूरकर काका अस्वस्थ झाले. कारण वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी त्यांच्या मुलाला काही मदत करत नाहीत. नागपूरकर काकाने आपल्या मुलाला वृत्त वाहिनीमध्ये लावण्यासाठी धनंजय सोळंकेचा बळी घेतला. काका काम करत होते ती वृत्तवाहिनी मुलाकडून काढून संघरत्न पवारला दिली. आता काकाच्या मुलाला कोणी मदत करत नाही म्हणून त्यांनी आता नवीन डाव आखला आहे. त्यात वृत्तवाहिन्यातील रुखम्या डाकूला (हदगाव तालुक्यात 50 वर्षापुर्वी खराखुरा रुखम्या डाकू वास्तव्याला होता आणि त्याच्या अनेक दंतकथा प्रसिध्द आहेत.) आणण्याचा डाव आखला आहे. आपलाच सेवक असलेल्या संघरत्न पवार समोर असलेले ताट आता हिसकावून घेण्याच्या खलबतात राजू गिरी सामील झाला आहे.
राजू गिरी जेंव्हा वृत्तवाहिनीमध्ये काम करत होता. तेंव्हा वास्तव न्युज लाईव्हने त्याच्या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ प्रसिध्द करून बातमी लिहिली तशाच बातम्या तोपण करत होता. पण आता कोणाचाच टिळा आपल्या डोक्यावर नाही अशा परिस्थितीत महिलेची अवस्था होते. तशीच काहीशी अवस्था राजू गिरीची झाली आहे. हा टिळा ज्याला त्यानेच मिळून दिला तो टिळा आपल्या डोक्यावर लावून घेण्याची तयारी म्हणजे आपल्या शिष्याचे उष्टे ताट खाण्याचा प्रकार आहे आणि या ताट ओढण्याच्या प्रकारात नागपूरकर काका कोलांट उड्या मारत आहेत. आता समोर लोकसभा आणि विधानसभा लवकरच येत आहेत आणि नागपूरकर काकाच्या मुलाला कोणी मदत करत नाही म्हणून नागपूरकर काकांनी संघरत्नला काढून राजू गिरीला पुन्हा एकदा प्रस्तापित करण्याचा डाव आखला आहे.परंतू हा डाव देव यशस्वी होवू देईल की, नाही हे तर देवच जाणे.
वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीमध्ये एक वाक्य प्रसिध्द आहे ते असे की, राजू गिरी सांगायचा मी कोणाचाही गेम करू शकतो आणि गेम करणारा व्यक्ती पत्रकार सुध्दा असतो हे पाहुन पुन्हा एकदा स.आदत हसन मंटोची आठवण येते ज्यांनी स्वातंत्र्यापुर्वी म्हणले होते की, एक विकलेला पत्रकार आणि एक वेश्या एक सारखी असतात त्यातही वेश्येची किंमत जास्त असते.

पण अकबर बादशाहला बिरबलाने एकदा सांगितले होते की, बुंद से गई ओ हौदसे वापस नाही आती. ही म्हण आजही प्रसिध्द आहे. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!