TV9 मध्ये बातमी लावण्यासाठी हजार रुपये फिस ; 500 राजू गिरीचे आणि 500 बातमी लावण्याचे

नांदेड(प्रतिनिधी)-टी.व्ही.9 मध्ये बातमी लावायची असेल तर 1000 रुपये फिस लागते. त्यातील 500 रुपये राजू गिरीचे असतात आणि 500 रुपये बातमी लावण्यासाठी 500 रुपये लागतात अशी खळबळ जनक माहिती एका स्टिंग ऑपेरशनमधून समोर आली आहे.
जगातील पत्रकारांबाबत 50 च्या दशकात स.आदत हसनमन्टो यांनी सांगितले होते की, एक विक्री झालेला पत्रकार आणि एक वेश्या यांची श्रेणी एकच असते. त्यातही वेश्येची श्रेणी ही उच्च दर्जाची आहे. याचा अनुभव गेल्या 73 वर्षात हळूहळू येतच आहे. काल पर्यंत ज्यांच्याकडे लुना ही दुचाकी होती. त्यांच्याकडे आता वाताणुकूलीत चार चाकी वाहने आहेत. एका तालुक्यात एका व्यक्तीने एका युवकाचे स्टिंग ऑपरेशन केले. त्याला विचारणा केली की, तु कोणत्या चॅनलचा पत्रकार आहेस त्याने सांगितले की, मी टी.व्ही.9 चा पत्रकार आहे. दुसरा माणुस म्हणतो की, टी.व्ही.9 चा पत्रकार तर राजू गिरी आहे तेंव्हा तो म्हणतो बरोबर आहे या तालुक्याची कामे करण्याचा अधिकार मला राजू गिरीनेच दिलेले आहेत. तेंव्हा तो दुसरा व्यक्ती म्हणतो की, तुझ्याकडे टी.व्ही.9 चा माईक वगैरे काही दिसत नाही. तेंव्हा तो पत्रकार आपल्या बॅगमधील टी.व्ही.9 चा बुम काढून त्याला दाखवतो.
तो व्यक्ती सांगतो तुम्ही पत्रकार आहात, बातम्या लावणे तुमचे काम आहे. तेंव्हा टी.व्ही.9 चा तथाकथित पत्रकार उत्तर देतो आम्हाला ही पेट्रोल वगैरे खर्च असतो म्हणून फिस लागते. तुम्ही दिलेल्या 1000 रुपयांपैकी 500 रुपये राजू गिरी सर घेतात आणि 500 रुपये बातमी लावण्यासाठी लागतात. तो व्यक्ती सांगतो 1000 रुपये दिले तर बातमी नक्की लागते काय? तर टी.व्ही.9चा पत्रकार म्हणतो हो नक्कीच लागेल. आमच्याकडे प्राप्त झालेल्या व्हिडीओमध्ये बोलणारा माणुस त्याला 1000 देतो आणि सांगतो आमची बातमी नक्की येवू द्या बर तेंव्हा तो पत्रकार सांगतो की, बातमी लागेलच. हा चालला आहे धंदा पत्रकारांचा.
काही “अभंग्यांनी’ पत्रकारांना बरचे धंदे शिकवले, काहींना रॉकेल विकणे शिकवले, 52 टक्के धंद्यांचा जाहीरातींचा धंदा शिकवला आणि त्याच्या पायावर हात लावून वाढलेले सगळे पत्रकार धंदेवाईकच झाले. जास्त अद्रक लसण टाकून रस्सा हवा ही पाक कला सुध्दा शिकवली. काहींना तु दारुच पित नाहीस तर तुला दारुचा मजा काय माहित असे शिकवले. पण त्यांचे पितळ आता सर्वत्र उघड झाले आहे कारण बेघर पत्रकारांच्या सोसायटीमध्ये त्यांनी केलेला धंदा कोणाला दारुच्या नशेत अडकवला, काहींच्या किडण्या गेल्या, काही मरण पावले आणि काही गब्बर झाले. पण राजू गिरी मात्र त्या बेघर पत्रकारांच्या सोसायटीत सदस्य नाही. कोणी कोणता धंदा कारायचा ही त्याची त्याची आवड आहे. पण आपल्याला कुठे तरी जबाब द्यावा लागतो हे काही जण विसरले आहेत.
एका पोलीसाला आलेला फोन खुप महत्वाचा आहे. फोनवर पत्रकार सांगत होता आम्ही चार लोक आहोत आमच्या जेवणाची सोय करा. तेव्हा पोलीसाने एका हॉटेलचे नाव सांगितले आणि तेथे जा असे फर्मान सोडले. पत्रकार पार्टी तेथे जाण्याअगोदरच पोलीसाने हॉटेल मालकाला फोन केला आणि त्याला विहित रक्कम सांगितली. तेवढ्याचाच खर्च मी देईल असे सांगितले. यावरून असे वाटते की, खाण्या-पिण्यासाठी सुध्दा अशी भिक मागावी लागते काय? एका पोलीसाकडे फोन आला तो पत्रकाराला सांगत होता की, तुमचे पैसे आले नाही काय? बहुदा पैसे प्रवासात असतील ते येतीलच तुम्ही चिंता करू नका! काय लिहावे आणि काय न लिहिता थांबावे याचे गणितच वास्तव न्युज लाईव्हला जमेना.
संबंधीत व्हिडिओ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *