क्राईम ताज्या बातम्या

गुगलवर कस्टमर केअर क्रमांक शोधणे शिक्षकाला महागात पडले

नांदेड(प्रतिनिधी)-एका शिक्षकाने गुगलवर एसबीआय क्रेडीट कार्ड कस्टमर सर्व्हीसमधील क्रमांक शोधणे त्यांना चांगलेच महागात पडले. ठकसेनाने त्यांच्या क्रेडीड कार्ड आणि बसत खात्यातून 1 लाख 42 हजार 115 रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. रमेश भानुदास अंधाळे हे चिखली बु (ता.किनवट) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. दि.29 जुलै रोजी सकाळी त्यांनी आपल्या मोबाईलवर एसबीआय क्रेडीट कार्ड […]

क्राईम ताज्या बातम्या

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे घर फोडून फक्त १३ लाख ९० हजारांची चोरी

नांदेड,(प्रतिनिधी) – कायद्याला सर्वात मोठे स्थान देणाऱ्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक श्री अशोरावजी घोरबांड यांना चोरटयांनी आव्हान दिले आहे.चोरटयांनी पोलिसांचे घर फोडून १३ लाख ९० हजारांची चोरी केली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनेगाव येथे असलेल्या पोलीस वसाहतीतील पोलीस अंमलदार ज्ञानोबा कोंडीबा नाईकवाडे यांचे घर फोडतांना मुख्य दरवाज्याचे कुलूप १९ सप्टेंबरच्या सकाळी […]

क्राईम ताज्या बातम्या

सातेगाव महादेव मंदिराची दानपेटी फोडली

नांदेड(प्रतिनिधी)-सातेगाव महादेव मंदिर ता.नायगाव येथे महादेव मंदिरातील दानपेटी फोडून चोरी झाली आहे. अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जबरी चोरी घडली आहे. अनुरथ बाबा जाधव हे सातेगाव महादेव मंदिर ता.नायगाव येथे पुजारी आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 सप्टेंबरच्या सायंकाळी 7 वाजेपासून 18 सप्टेंबरच्या पहाटे 6.30 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी मंदिराच्या चॅनेलगेटचे कुलूप तोडून आणि चॅनेल गेट […]

क्राईम ताज्या बातम्या

डीपीतील 60 लिटर ऑईल चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-नवघरवाडी ता.कंधार शिवारात एक डीपी खाली पाडून त्यातून 9 हजार 600 रुपयांचे ऑईल चोरल्याचा प्रकार घडला आहे. महावितरण कार्यालय कंधार येथील कनिष्ठ तंत्रज्ञ अरबाज दावलशाह सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 सप्टेंबरच्या पहाटे 3 वाजेदरम्यान नवघरवाडी ते कंधार रस्त्यावरील महावितरण कंपनीने बसवलेला डीपी क्रमंाक 4447711 हा लालू गोविंद गायकवाड रा.मरघाट रस्ता नांदेड आणि सत्तार रा.रायवाडी ता.लोहा […]

क्राईम ताज्या बातम्या

मॉर्निंगवॉक करतांना पत्रकाराची 32 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लुटली

नांदेड(प्रतिनिधी)-मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका पत्रकाराची 32 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन दरोडेखोरांनी खंजीरचा धाक दाखवून तोडून नेल्याचा प्रकार आज सकाळी 7 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. कौठा भागात राहणारे पत्रकार तुकाराम सावंत हे दररोजप्रमाणे आज सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले. नियमित कार्यक्रमानुसार त्यांच्यासोबत नेहमी 8 ते 10 लोक असतात परंतू आज मराठवाडा मुक्ती संग्राम […]

क्राईम ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हा शाखेने चोरीच्या पाच दुचाकी पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन दुचाकी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 77 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या दोन्ही चोरट्यांना बिलोली पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या गुप्त माहितीनुसार बिलोली उपविभागात लोहगाव ता.बिलोली येथील प्रभाकर वानोळे यांच्या घरी जावून पोलीस पथकाने पाहणी केली असता […]

क्राईम ताज्या बातम्या

बोधडी ता.किनवट गावात काही वेळेच्या अंतरा घडले दोन खून ; खूनाचा बदला खून असा घडला प्रकार ?

नांदेड(प्रतिनिधी)-बोधडी ता.किनवट येथे झालेल्या एका खूनाचा बदला मयताच्या नातेवाईकांनी त्वरीतच घेतला. अशा प्रकारे काही वेळेव्या अंतरात बोधडी येथे दोन खून घडले आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार व्यंकट सुरेश देवकर (२०) रा.बोधडी याचा अनिल मारोती शिंदे या व्यक्तीने क्षुल्लक कारणावरुन खून केला. याचा बदला घेतांना मयत व्यंकट सुरेश देवकरच्या नातलगांनी मारोती शिंदे (२७) याचा खून केला. मारोतीला […]

क्राईम ताज्या बातम्या

ईस्लापूर शिवारात पोलीस उपनिरिक्षकाचा शर्ट धरून धक्काबुक्की

नांदेड(प्रतिनिधी)-तहसीलदारांच्या आदेशानुसार ईस्लापूर शिवारातील एका शेत जमीनीचा ताबा देत असतांना काही जणांनी पोलीस उपनिरिक्षकासोबत धक्कबुक्की केली. याबाबत ईस्लापूर पोलीसांनी चार जणांविरुध्द सरकारी कामात अडथळा केला या सदरात गुन्हा दाखल केला. ईस्लापूर येथील पोलीस उपनिरिक्षक योगेश बाबुराव बोधगिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास ईस्लापूर शिवारातील गोपाळ पाटील यांची विवादीत जमीन शेत […]

क्राईम ताज्या बातम्या

सासरच्या मंडळीनी आपल्या नातीच्या नावावरील 73 लाख 50 हजार हडपले

नांदेड(प्रतिनिधी)-एका बालिकेच्या नावाची विमा पॉलीसी कंपनीतील 49 टक्के भाग भांडवलाची रक्कम 73 लाख 50 हजार रुपये तिच्या पालक असलेल्या आईला न सांगता काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. महिलेच्या सासरच्या पाच मंडळीविरुध्द मांडवी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. 28 वर्षीय महिला जि मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पतीचे निधन झाले आहे आणि […]

क्राईम ताज्या बातम्या

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोटात चाकू खुपसून दरोडा

  नांदेड,(प्रतिनिधी)- अत्यंत कडक शिस्तीचे पोलीस निरीक्षक असलेल्या नदी पलीकडील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री एका ४३ वर्षीय माणसाच्या पोटाचं चाकू खुपसून त्यांच्याकडील १२ हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल असा ऐवज दरोडेखोरांनी लुटला आहे. प्राप्त माहितीनुसार नांदेड शहरातून लातूर कडे जाणाऱ्या लातूर फाटा येथे गणेश उमाजी राठोड (४३) रा.घोडस तांडा ता.कंधार हे […]