श्री शिवाजी प्राथमिक शाळेत ख्रिसमस सण उत्साहात साजरा

नांदेड (प्रतिनिधी)-वजिराबाद येथील श्री शिवाजी प्राथमिक शाळेमध्ये ख्रिसमस (नाताळ) सण अत्यंत आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात…

डॉ.पंजाबराव देशमुख यांचे सहकार, कृषी व शिक्षणामध्ये मोठे योगदान-गुणवंत एच.मिसलवाड

नांदेड – स्वातंत्र्य भारत देशाचे पहिले कृषी मंत्री म्हणून कार्य करतांना शेतकऱ्यांसाठी कृषी महाविद्यालये व…

हजूर साहिब की संगत को एक व्यापक और संवेदनशील सोच अपनाने की आवश्यकता है।

2008 में हुए गुरतागद्दी समारोह के बाद से तख़्त सचखंड श्री हजूर साहिब में देश-विदेश…

हिंगोलीत कायदा नाही, खुर्चीचा खेळ! एक जिल्हा… दोन पोलीस अधीक्षक

हिंगोली (प्रतिनिधी)-हिंगोली जिल्ह्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा कारभार कमी आणि “पोलीस अधीक्षकांची संगीत खुर्ची” जास्त सुरू असल्याचे चित्र…

मैदान तापलं, उत्साह उसळला!नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड एज्युकेशन सोसायटी द्वारा सायन्स कॉलेजच्या प्रांगणात संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्था अंतर्गत पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, पीपल्स हायस्कूल मधील शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा स्पर्धांना गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. नांदेड एज्युकेशन सोसायटी द्वारा सायन्स कॉलेजच्या प्रांगणात संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्था अंतर्गत पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, पीपल्स हायस्कूल मधील शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा स्पर्धांना गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते  सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. दिलीप गवई, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, कार्यकारणी सदस्य एड. सी बी दगडिया, कॉ. प्रदीप नागपूरकर, डॉ. कुंजम्मा काब्दे, डॉ. अजीत काब्दे, प्राचार्य. लक्ष्मण शिंदे, प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर, मुख्याध्यापक नितीन सेलमोकर, उपप्राचार्य एकनाथ खिल्लारे, विलास वडजे, राहुल गोरे यांची उपस्थिती होती. शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास, संघ भावना, खेळाडू वृत्ती वृद्धिंगत व्हावी, शारीरिक व मानसिक विकासाला चालना देण्यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आदी स्पर्धांचा समावेश असून सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल येथे या स्पर्धा रविवार (दिनांक 28) पर्यंत उत्साहात रंगणार आहेत. शिक्षक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यावेळी बोलताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन म्हणाले की नांदेड एज्युकेशन सोसायटी ही गेल्या चार वर्षांपासून आपल्या तीन घटक संस्थांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा संस्थेचे उपाध्यक्ष सी.ए. डॉ. प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करीत आहे. त्यामुळे निश्चितच शिक्षक व कर्मचारी यांच्यामध्ये खेळ भावना वृद्धींगत होत आहे. प्रास्ताविकात सीए. डॉ. प्रवीण पाटील  म्हणाले की, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये फारसा समन्वय असत नाही, ते एकमेकांना ओळखत सुद्धा नाही. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अतिशय पूरक आहे. तसेच आपले हेवे दावे दूर करून एक खेळ भावना निर्माण व्हावी यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. दिलीप गवई यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी आपल्या आरोग्यासाठी खेळाचे महत्व पटवून देत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय कदम यांनी केले तर आभार प्रा. एकनाथ खिल्लारे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजेश देशमुख यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजेश देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून पोलीस…

निर्दयपणे कोंबून वाहतुक होणारे आठ गोवंश मनाठा पोलीसांनी पकडले

नांदेड(प्रतिनिधी) -दोन मालवाहतुक गाड्या पकडून मनाठा पोलीसांनी अत्यंत कु्ररतेने वागणूक देवून गोवंशाची होणारी वाहतुक पकडली…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूचा टेम्पो पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूने भरलेला टेम्पो पकडला आहे. टेम्पोची किंमत 3 लाख आणि 1…

धर्माबाद तालुक्यात घरफोडून 3 लाखांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद शहरातील आनंदनगर येथे घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. तसेच चिकाळा…

अंदर-बाहर खेळणाऱ्या 12 जुगाऱ्यांना पकडून 1 लाख रुपये रोख रक्कमेसह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे तलबीड येथे जुगार खेळणाऱ्या 12 जणांना पकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी उत्कृष्ट…

error: Content is protected !!