नांदेड(प्रतिनिधी)-आज भाद्रपद चतुर्थदशीच्या दिवशी शहरात व जिल्ह्यात अत्यंत उत्साहात गणपती बापा मोरया पुढच्यावर्षी लवकर या या गजरात गणपती विसर्जन करण्यात आले. शहरात इतवारा, नगीनाघाट, गोवर्धनघाट आदी ठिकाणी कृतिम तलाव तयार करण्यात आले होते. शहराबाहेर पासदगाव, पुयणी, झरी येथे सुध्दा कृतीम तयार निर्मित करण्यात आले होते.
दहा दिवस श्री गणेश महोत्सव साजरा झाल्यानंतर आज त्यांच्या विसर्जनाचा दिवस. सकाळी 5 वाजेपासून ढोल ताशांच्या गजरात सुर्योदयासह श्री गणेश विसर्जन मिरवणूकी्रची सुरूवात झाली. शहरातील इतवारा भागातील संत दासगणु पुल, नगीनाघाट, गोवर्धनघाट, शहराबाहेर पासदगाव, पुयणी, झरी आदी ठिकाणी प्रशासनाने गणेश विसर्जनासाठी कृत्रित तलाव तयार केले होते. नदीमध्ये कोणीच गणेश विसर्जन करून नये अशी सु प्रशासनाने केली होती. नदीजवळ जीवरक्षक दलाचे जवाना कोणत्याही दुर्घटनेस सामोरे जाण्यासाठी तयार होते. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका आदींनी आप ल्या अनेक अधिकारी आणि पोलीस अंमलदारांसह श्री गणेश विसर्जनात कोणतीही बाधा उत्पन्न होणार नाही यासाठी परिश्रम घेतले. भक्तांनी अनेक ठिकाणी गणेश विसर्जन पाहण्यासाठी आलेल्या भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.