स्थानिक गुन्हा शाखेने मोबाईल टावरमधील कार्ड चोरणारे दोन जण पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दोन चोरट्यांना पकडून त्यांनी एअरटेल कंपनीचे चोरलेले सहा कार्ड पकडले आहेत. या साहित्याची किंमत 1 लाख रुपये आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार यांनी जिल्ह्यात विविध मोबाईल टावरच्या कार्ड चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कंबर कसली. त्यांनी आपल्या पथकासह एस.यु.वडजे (40) रा.नायगाव जि.नांदेड आणि मोहम्मद रफिक मोहम्मद फहिमोद्दीन(37) रा.इमरान कॉलनी देगलूर नाका या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2, देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2, नायगाव आणि कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी 1 असे सहा कार्ड चोरले आहेत. या सर्व कार्डची किंमत 1 लाख रुपये आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, संजीव जिंकलवाड , संतोष बेल्लूरोड, विश्र्वनाथ पवार यांचे कौतुक केल ेआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!