नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत रविंद्र चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, ऍड.भोसीकर, खतगावकर यांच्यासह प्रा.राजू सोनसळे संभाव्य उमेदवार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा मतदार संघात येणाऱ्या पोट निवडणुकांमध्ये माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, किंवा त्यांच्या सूनबाई मिनल पाटील खतगावकर,खा.वसंत चव्हाण यांचे सुपूत्र रविंद्र चव्हाण , वंचित बहुजन आघाडीचे ऍड.अविनाश भोसीकर यांच्यासह आंबेडकर चळवळीत नेतृत्व प्रा.राजू सोनसळे यांना संभाव्य उमेदवार मानले जात आहे.
नांदेड लोकसभा मतदार संघाचे खा.वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारांच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चा आजही सुरू आहेत. निवडणुकीचे अर्ज भरेपर्यंत सुरू राहणार आहेत. सर्वसामान्यपणे मतदार ज्या मतदार संघातील राज्यसभा किंवा विधानसभा सदस्य मरण पावल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांतील व्यक्तीलाच तो राजकीय पक्ष उमेदवारी देतो. त्याप्रमाणे खा. वसंत चव्हाण यांचे सूपत्र रविंद्र चव्हाण हे या पोट निवडणुकीत कॉंगे्रसकडून प्रमुख दावेदार आहेत. तरी पण अनेक दिवस भाजपमध्ये राहिलेले भास्करराव पाटील खतगावकर कॉंगे्रसमध्ये येणार आहेत. म्हणजे ते स्वत: किंवा त्यांच्या सुनबाई मिनल खतगावकर यांच्यासाठी ते कॉंगे्रस पक्षाकडून तिकिट मागतील. याशिवाय मागच्या निवडणुकीत पराव लेले ाजी खा.प्रताप पाटील चिखलीकर हे भारतीय जनता पार्टी किंवा इतर कोणताही राजकीय पक्ष त्यांना तिकिट देईल त्यांच्याकडून हे उमेदवारी घेतीलच. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे मागील लोकसभेचे उमेदवार ऍड.अविनाश भोसीकर हे सुध्दा आपल्यासाठी तिकिट मागतील. या सर्वांसोबत आंबेडकर चळवळीतील एक नेतृत्व प्रा.राजू सोनसळे सुध्दा या निवडणुकीत एक संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यांनी कोणत्या पक्षाकडे तिकिट मागतील. पक्ष त्यांना तिकिट देईल की नाही तरीपण ते अपक्ष उमेदवार म्हणून नांदेड लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी एक संभाव्य उमेदवार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!