राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने मेंदु विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी 19 ते 21 सप्टेंबर मोफत आरोग्य शिबिर

नांदेड(प्रतिनिधी)-मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी 19 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर असे तीन दिवस निदान आणि उपचार यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राजस्थानी एज्युकेशन सोसायटी तसेच श्री.रामप्रताप मालपाणी मुकबधीर विद्यालयातील अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा आणि इतर संचालक मंडळातील सदस्यांनी पत्रकारांना दिली. जनतेने या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, त्यासाठी नवीन रुग्णांनी नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.
राजस्थानी एज्युकेशन सोसायटी, जय वकील फाऊंडेशन, बी.जे.वाडीया हॉस्पीटल फॉर चिल्ड्रेन्स मुंबई, कमल उडवाणीया फाऊंडेशन, एन.एच.एस.आर.सी.सी. चिल्ड्रेन्स हॉस्पीटल मुंबई, अन्नम एनओसीएन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 13 वर्षापासून नांदेडच्या आर.आर.मालपाणी मतिमंद व श्री.रामप्रताप मालपाणी मुकबधीर विद्यालयात हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येते. मगणपुरा येथे यासाठी मोठी तयारी सुरू आहे. या पत्रकार परिषदेचे सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी, बनारसीदास अग्रवाल, सचिव प्रकाश मालपाणी, सहसचिव डॉ.लक्ष्मीकांत बजाज, शाळेचे मुख्याध्यापक नितिन निर्मल हे उपस्थित होते.
मेंदुच्या विकारांनी गस्त असलेल्या मुला-मुलींसाठी हे 26 वे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.19, 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मगणपुरा नवा मोंढा येथील आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात हे शिबिर होणार आहे. डॉ.अनैता हेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तज्ञ डॉक्टरांच्या पथकामार्फत हे उपचार केले जातात.
                                             नवीन रुग्णांनी त्वरीत नोंदणी करावी
ज्या रुग्णांना पहिल्यांदा या शिबिरात यायचे आहे. त्यांनी याची नोंदणी करावी असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. नोंदणीसाठी आर.आर.मालपाणी विद्यालय मगणपुरा येथे प्रत्यक्ष जावून ही नोंदणी करावी. बाहेरगावातील रुग्णांना नोंदणीसाठी संस्थेने संजय रुमाले यांचा मोबाईल क्रमंाक 9067377520 आणि मनिषा तिवारी यांचा मोबाईल क्रमांक 8208114832 आणि किनवट परिक्षेत्रातील रुग्णांसाठी साने गुरूजी रुग्णालय किनवट येथील मोबाईल क्रमांक 8975954827 उपलब्ध करून दिला आहे. रुग्णांनी या सुविधेचा फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
या प्रसंगी बोलतांना संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा म्हणाले आम्ही समाज सेवेसाठी गेल्या 13 वर्षापासून हेे आरोग्य शिबिर चालवत आहोत. त्यासाठी जनता सुध्दा सहकार्य करते. याप्रसंगी डॉ.लक्ष्मीकांत बजाज म्हणाले की, आजपर्यंत या शिबिरात 7 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर त्या रुग्णांच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. त्यातून 2500 -3000 रुग्ण बरे झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर सुध्दा अनेक प्रक्रियांचे वेगवेगळे उपचार करावे लागतात. त्यासाठी सुध्दा आम्ही प्रयत्न करतो. बाळ जन्मताच त्याच्यात असलेल्या मेंदु विकाराची ओळख लवकर झाली तर 100 टक्के पैकी 20 टक्के रुग्ण तयार होवून समाजावर होणारा दबाव आम्ही थांबवून शकतो. त्यासाठी सुध्दा आम्ही प्रयत्न करत आहोत. बालक आणि बालिकांच्या मेंदुवर झालेल्या परिणामांचा उपचार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची संख्या 30 टक्के असल्याचे डॉ.बजाज म्हणाले. नांदेडच्या उपचार शिबिरात गरजवंतांनी सहभाग नोंदवावा आणि आपल्या मुलांसोबत झालेल्या प्रकृतीच्या त्रासाला रोखण्यासाठी प्रयत्न करावेत असे डॉ.बजाज म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!