अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाख 96 हजारांचा संशयीत तांदुळ पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-खबरीलालने खबर दिल्यानंतर अर्धापूर पोलीसांनी एक ट्रक पकडला त्यामध्ये संशयीत स्वस्त धान्याचा तांदुळ असल्याची प्रेसनोट जारी केली. पण खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ट्रक चालकाकडे नांदेड ते गोंदिया जाण्याची बिल्टी आहे. तरी पण सध्या तो ट्रक पोलीस ठाणे अर्धापूर येथे उभा आहे.

पोलीसांनी जारी केलेल्या प्रेसनोट क्रमांक 308 नुसार अवैध धंद्यांवर कार्यवाही करतांना एक संशयीत ट्रक जांभरून फाट्याजवळ थांबिवला. त्यात तांदुळ होता. हा ट्रक क्रमांक एम.एच.22 एए 3366 असा आहे. त्यामध्ये 7 लाख 96 हजार 485 रुपयांचा संशयीत स्वस्त धान्याचा तांदुळ आहे. ट्रकची किंमत 10 लाख असा 17 लाख 96 हजार 485 रुपयांचा मुद्देमाल सध्या पोलीस ठाणे अर्धापूर येथे उभा आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून चाचणी केल्यानंतर या ट्रकविरुध्द जीवनावश्यक वस्तु कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दिले आहेत.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनात अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस अंमलदार य आडे, महेंद्र डांगे, विजय कदम आणि पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथक क्रमांक 6 मधील पोलीस उपनिरिक्षक प्रविण हालसे, पोलीस अंमलदार ब्रम्हानंद लांबतुरे, राम मुळे, पंढरी जाधव यांनी ही कार्यवाही केली आहे.

प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार या ट्रक चालकाकडे तांदुळ नांदेड ते गोंदिया घेवून जाण्याची बिल्टी आहे. तांदळाचे बिल आहे तरी पण ही कार्यवाही करण्यात आलेली आहे.

One thought on “अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाख 96 हजारांचा संशयीत तांदुळ पकडला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!