अर्धापूर (प्रतिनिधी)-अर्धापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दु येथील प्रभारी मुख्याध्यापक शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करीत असल्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे अशी मागणी करणारा अर्ज अर्धापूर येथील सय्यद मंजुरअली सय्यद खुर्शीद यांनी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अर्धापूर यांच्याकडे केली आहे. या अर्जाच्या प्रति मंजुरअली यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी नांदेड आणि जिल्हा शिक्षाणाधिकारी नांदेड यांना पण पाठविल्या आहेत. सय्यद मंजुरीअली यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे नवीआबादी येथे असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दु येथील प्रभारी मुख्याध्यापकांनी महाराष्ट्र शासनाचे आदेश व आपल्या कार्यालयाच्या नोटीसचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी. दि.8 फेबु्रवारी 2024 रोजी शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांनी जारी केलेले शासन परिपत्रक बाबत ते कार्यवाही करत नाहीत. तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने 14 ऑगस्ट रोजी शाळेस दिलेल्या पत्राबाबत सुध्दा आदेशाचे पालन केलेले नाही. तरी यासाठी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही व्हावी. Kanthak Suryatal Post Views: 1,295 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्थानिक गुन्हा शाखेने 6 लाख 10 हजारांचे पशुधन पकडले अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाख 96 हजारांचा संशयीत तांदुळ पकडला