नांदेड – येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा शासकीय कंत्राटदार नरेश पैंजणे (५३) यांचे शनिवारी सकाळी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार दि.१ सप्टेंवर रोजी सकाळी १० वा. गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर कस्तुरी निवास, यशवंतनगर विस्तारीत येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. परभणी येथील निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांचे ते पती होत. नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी कंत्राटदार म्हणून काम केले आहे.
More Related Articles
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना
नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 10 जुलै 2025 रोजी दुपारी 12:54 वाजता…
वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त सामुहिक गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
*जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग* नांदेड :– “वंदे मातरम” या राष्ट्रभावना जागविणाऱ्या गीताच्या 150…
हिऱ्यांच्या दुकानाला लागली आग
नांदेड, (प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील मालाबार या हिऱ्यांच्या दुकानाला सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास आग लागली.पण…
