नांदेड(प्रतिनिधी)-नवनिर्वाचित लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य असणाऱ्या खासदारांचा नागरी सत्काराचे आयोजन वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने दि.8 सप्टेंबर रोज रविवारी गुरूवर्यांच्या उपस्थितीत राजेंद्र हुरणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने खा.डॉ.अजित गोपछडे आणि खा.डॉ.शिवाजी काळगे यांचाा समाजाच्यावतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यासाठी दिव्य सानिध्य म्हणून श्री. ष.ब्र. 108 सोमलिंग शिवाचार्य महाराज(बिचकुंदा),श्री. ष.ब्र. 108 दिगंबर शिवाचार्य महाराज(वसमत), श्री. ष.ब्र. 108 डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज(मुखेड),श्री. ष.ब्र. 108 सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज(बेटमोगरा),श्री. ष.ब्र. 108 करबसव शिवाचार्य महाराज(वसमत), श्री. ष.ब्र. 108 शंभुलिंग शिवाचार्य महाराज(उदगीर),श्री. ष.ब्र. 108 शिवानंद शिवाचार्य महाराज(तमलूर), श्री. ष.ब्र. 108 काशिनाथ शिवाचार्य महाराज(पाथरी), श्री. ष.ब्र. 108 शिवचैतन्य शिवाचार्य महाराज(हदगाव), श्री. ष.ब्र. 108 गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज(गिरगाव), श्री. ष.ब्र. 108 विरुपाक्ष शिवाचार्य महाराज(मांजरसुंबा),श्री. ष.ब्र. 108 महादेव शिवाचार्य महाराज(वाई), श्री. ष.ब्र. 108 शिवचैतन्य शिवाचार्य महाराज(आष्टी),श्री. ष.ब्र. 108 महादेव शिवाचार्य महाराज, कळमनुरी, श्री. ष.ब्र. 108 सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज(साखरखेर्डा) लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेडभूषण राजेंद्र हुरणे तर विशेष उपस्थितीत डॉ.त्र्यंबक दापकेकर, मुख्य अभियंता इंजि.बसवराज पांढरे, उपायुक्त वस्तु व सेवाकर विभाग निलेश शेवाळकर, आकर विभागाचे उपायुक्त प्रसाद मेनकुदळे, उपजिल्हाधिकारी प्रविण मेगशेट्टे, उपजिल्हाधिकारी सौ.सुप्रिया डांगे, (मेनकुदळे), जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, सहाय्यक मुख्य अभियंता जलसंपदा विभाग इंजि.राजू देशमुख, लेखाधिकाीर प्रादेशिक परिवहन विभाग विनायक शिराळे, कार्यकारी अभियंता सा.बां. इंजि.प्रशांत कोरे, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, तहसीलदार नेमाजी देवणे, लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. हा कार्यक्रम दि.8 सप्टेंबर रोज रविवारी सकाळी 11 वाजता लिंगैक्य गणपतराव मोरगे सभागृह भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.