नांदेड :- केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांच्या आई जसबीर कौर यांचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सचखंड गुरूद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंत सिंघजी जथेदार, संत बाबा रामसिंघजी सहायक जथेदार, अधीक्षक सरदार राज देवेंद्र सिंघजी, सहायक अधिक्षक स. रविंद्रसिंघ कपूर, जयमलसिंघ ढिलो, रविंद्रसिंघ बुंगई, राजेंद्रसिंघ पुजारी, रेल्वेचे प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक बी नागया, बांधकाम मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. अग्रवाल, विभागीय क्षेत्रिय व्यवस्थापक निती सरकार, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, दिलीप कुंदकुर्ते, संतुक हंबर्डे, आदींची उपस्थिती होती.
More Related Articles
जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू
नांदेड (जिमाका)- -जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख यांची पदस्थापना…
नांदेड शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
महसूल पंधरवडा- आपत्ती बाबत जनजागृती करीता जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम नांदेड :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,…
सोशल मिडीयाचा गैर वापर झाला तर कार्यवाही होईल-श्रीकृष्ण कोकाटे
नांदेड(प्रतिनिधी)-मतदान संपण्याच्या 48 तासादरम्यान शॉर्ट मॅसेज सर्व्हीसेस(एसएमएस) आणि इतर सोशल मिडीया वरुन माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर…