नांदेड(प्रतिनिधी)-एका 32 वर्षीय युवकाने आत्महत्या करतांना आपली पत्नी, सासरा आणि सासु या तिघांना जबाबदार धरावे अशी नोंद नोटसऍपमध्ये करून आत्महत्या केल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
नांदेडचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत बापुराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा चेतन चंद्रकांत पाटील (32) याने 14 डिसेंबर 2023 रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास मगनपुरा येथील आपल्या घरात आत्महत्या केली. त्यावेळी आकस्मात मृत्यू दाखल झाला होता. पण आता दिलेल्या तक्रारीनुसार मरताना चेतन पाटील यांनी आपल्या ऍपल कंपनीच्या मोबाईल फोनमधील नोटस ऍपमध्ये मला जर मरण आले तर त्यास माझी पत्नी हर्षा, तिचे वडील हरीष जबाबदार राहतील असे लिहिलेले होते. या दोघांनी सोडचिठ्ठी दे म्हणून तगादा लावला होता आणि 1 कोटी रुपयांची मागणी करत होते. या त्रासाला कंटाळूनच माझा मुलगा चेतन याने आत्महत्या केली आहे.
शिवाजीनगर पोलीसांनी हा घटनाक्रम भारतीय न्यायसंहितेच्या कलम 108, 352,351(2), 351(3) आणि 3(5) नुसार चेतनची पत्नी हर्षा चेतन पाटील, तिचे वडील हरीश असवानी, त्यांची पत्नी रितू हरीश असवानी रा.पुरूषार्थनगर नांदेड या तिघांविरुध्द गुन्हा क्रमांक 328/2024 दाखल केला असून प्रकरणचा तपास शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे हे करीत आहेत.